1 min read

लासूर येथे सत्यशोधक प्रा. हरी नरके सरांची अभिवादन सभा संपन्न.

Loading

लासूर येथे सत्यशोधक प्रा. हरी नरके सरांची अभिवादन सभा संपन्न.

महाराष्ट्रातील संशोधक फुले शाहू आंबेडकरी, सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, विचारवंत, व्याख्याते प्रा. डॉ. हरी नरके सर यांची विनम्र अभिवादन सभा लासूर ता. चोपडा जिल्हा जळगाव येथील माळी समाज मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.
या अभिवादन सभेत शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्ये मोठ्या संख्येत उपस्थित होते.
स्व.प्रा.हरी नरके यांना अभिवादन सभेत माळी समाजाचे अध्यक्ष ए. के. गंभीर सर, लासूर ग्रामपंचायत चे माजी सरपंच देवीलाल बाविस्कर सर, तंटामुक्ती समिती चे उपाध्यक्ष उपेंद्र पाटील, श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी त्यांचा जीवनपट व त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला.
सदर अभिवादन सभेप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष तथा तंटामुक्ती गाव समिती चे अध्यक्ष ए के गंभीर सर, श्रीराम बांधकाम समिती चे अध्यक्ष हिम्मतराव महाजन, संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन शंकर माळी,माजी चेअरमन गोविद माळी,वि.का.सोसायटी चे चेअरमन सुरेश माळी,संचालक नोमिल पटेलिया,माजी सरपंच देवीलाल बाविस्कर, माळी समाजाचे सचिव सुरेश पवार, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष उपेंद्र पाटील,पुणे माळी समाजाचे अध्यक्ष लीलाधर मगरे, पतसंस्थेचे व्हा चेअरमन प्रविण मगरे, पत्रकार दिलीप पालिवाल, आबा कोळी, भास्कर महाजन,जिभाऊ टेलर्स, सुभाष वाघ, मुरलीधर सोनवणे, नरेंद्र महाजन, दिपक महाजन, मास्टर टेलर्स, योगेश्वर माळी,प्रेमराज शेलकर आदी उपस्थित होते.
अभिवादन सभेचे सुत्रसंचालन श्री संत सावता माळी युवक सघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी तर आभार प्रेमराज शेलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *