कल्याणमधील अभिनव विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()

कल्याणमधील अभिनव विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या पारनाका येथील शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी तपस्या फाउंडेशनच्या नीलाताई दामले, छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस व शालेय समिती अध्यक्ष डॉ निलेश रेवगडे कार्यकारिणी सदस्य मिलिंद कुलकर्णी, अशोक फर्डे नागेश पवार सुरेंद्र भालेकर शाळेचे मुख्याध्यापक संपत गिते पर्यवेक्षक आवटे यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर इ.नववी च्या विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली देशभक्तीपर आधारित नृत्यही शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
यानंतर आनंदी गोपाळ जोशी सभागृहात शालेय दप्तर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
शाळेतील गरिब व गरजू विद्यार्थांना शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या 1999 च्या बॅचतर्फे गणवेश वाटप केले .याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात श्री.शरद आव्हाड,श्री.अनिकेत जुन्नरे,श्री.समीर कांगणे,श्री.प्रवीण गायकवाड,श्री.रोहिणी राजे,श्री.रेखा पाठक,श्री.सोनल मोरे,श्री.मुकेश धुरी हे उपस्थित होते.तपस्या फाउंडेशनच्या मा.नीलाताई दामले यांच्याहस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.तसेच त्यांनी शाळेला भरघोस मदतही केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री पवार साहेब यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना खरा इतिहास वाचा,तसेच पुस्तकांशी मैत्री करण्यास सांगितले मुख्याध्यापक संपत गिते यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडून प्रास्ताविक केले.नीलाताई दामले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, पालक, हितचिंतक पत्रकार, माजी विद्यार्थी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपन्न झाला.

