सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()

सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
असोदा- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरवातीला गावात प्रभात फेरी काढण्यात आली गावातील महर्षी वाल्मिक, छत्रपती शिवाजी महाराज, कवयित्री बहिणाबाई चौधरी,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. ध्वजारोहण संस्थेचे संचालक पंडित चौधरी तर स्काऊट गाईडचे ध्वजारोहण संचालक दिलीप महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलासराव चौधरी,सचिव कमळाकर सावदेकर,सुनील चौधरी, के.आर.चौधरी, दुर्गादास भोळे, गोपाळ भोळे, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल पर्यवेक्षक एल.जे. पाटील व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कोल्हे उपस्थित होते.
याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा लढा यावर आधारित नृत्य सादर करण्यात आले.रुचिता सूर्यवंशी ,रेश्मा चिरमाडे, देवयानी माळी या विद्यार्थिनींनी गीत गायन तर तृप्ती बिऱ्हाडे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात भावना चौधरी यांनी प्रयत्न केलेत. सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन तर आभार मंगला नारखेडे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

