1 min read

श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय तसेच श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा..

Loading

स्वातंत्र्याचा वर्धापन दिनाचा आनंदोत्सव साजरा
आज 15 ऑगस्ट 2023 रोजी श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय तसेच श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेत आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनाचा राष्ट्रीय ध्वजारोहण युवा नेतृत्व तसेच संचालक अमेय भैय्या मुंदडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सर्व हजारो शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक -पालक यांच्यासाठी शुद्ध फिल्टर पाण्याचा लिटर एक हजार लिटर क्षमता असलेला प्लांट अध्यक्ष प्रकाश भाऊ मुंदडा यांच्या शुभहस्ते व चिटणीस श्री राजूभाऊ मुंदडा यांच्या उपस्थितीत आज सुरू करण्यात आला. तसेच अमेय भैय्या मुंदडा यांनी सर्व विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या पायावर स्वतंत्रपणे कशी जीवनशैली आचरणात आणणार !याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी चतुर्थ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. सोनवणे यांनी करून उपस्थितांची मन जिंकली. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट म्हणून खाऊ वाटप आणि सर्व मान्यवरांना चहा पाण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *