1 min read

श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत आज दि. 15/08/2023 रोजी 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. संदीप गोसावी सर यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आप्पासो. श्री. सुरेश ठाकूर यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माझी विद्यार्थी दादासो.अमीन पिंजारी यांची निवड करण्यात आली, ध्वजपूजन व ध्वजारोहण प्रमुख पाहुणे दादासो. अमीन पिंजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले,कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य केले, कार्यक्रमाचे आभार शाळेचे शिक्षक श्री. एच. जी. पाटील सर यांनी मानले, कार्यक्रमास याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. एम. ए. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. एस. एम. पाटील सर, सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *