1 min read

अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी

Loading

अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी
अमळनेर येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 228 वी पुण्यतिथी अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने साजरा करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा गौरव केला. विविध ज्योतिर्लिंगांवर मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तसेच त्यांच्या जीवनातील संघर्ष कथन केला. बहुविध आयामी व्यक्तिमत्त्व म्हणून अहिल्याबाई होळकर होत्या. व्यवसायाला चालना देणारे शासक, त्यांनी बांधलेले चर्च, बौद्ध विहार, मज्जिद तसेच पाय विहीर आजही जशाच्या तशा आहेत. त्यांचा राज्यकारभार आदर्श होता. असे मान्यवरांनी नमूद केले. यावेळी बाहेर गावाहून आलेले मान्यवरांसमवेत अमळनेर तालुका धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण केले व येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणा दिल्या. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *