कै.पहिलवान कृष्णा (भाऊ) उफाडे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थांना अल्पोपहार वाटप
![]()


कै.पहिलवान कृष्णा (भाऊ) उफाडे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थांना अल्पोपहार वाटप
मोराणे दि. १३ ऑगस्ट – कै. पहिलवान कृष्णा (भाऊ) उफाडे यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त रावण ग्रुप व मित्र परिवार यांच्या वतीने निवासी मतिमंद विद्यालय, मोराणे येथील विद्यार्थांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
धुळे व मोराणे परिसरातील युवकांनी कै.कृष्णा यांना अनुभवले आहे. सामजिक व राजकीय कार्यात तो नेहमी मित्रांसोबत अग्रेसर होता. ज्याच्या स्वभावात मैत्री असते तो कोणतंही नातं टिकवू शकतो. अशा या मैत्रीपूर्ण स्वभाव असलेल्या व्यक्तींबरोबर आपण मैत्रीचे नातं जोडतो. अशा या नात्यातला कै. कृष्णा भाऊ होता. तो आज आपल्यात नाही असे मित्रांनी दुःख व्यक्त केले.
श्री. नितीन मालचे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व कार्यक्रम प्रसंगी श्री. गणेश उफाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी माजी ग्रामपंचायत मोराणे सदस्य श्री. मयुर दादा ठाकरे, रावण ग्रुपचे अध्यक्ष श्री. नितीन मालचे, धुळे प्रभाग क्र. ०६ चे युवा नेते किरण (भाऊ) पाटील, श्री. संजय बोरसे, श्री.दिपक पारधी, श्री.गणेश पवार, श्री. आकाश उफाडे, श्री.अनिल भील, श्री. घमू पाटील, श्री. वैभव ठाकरे व आदी मित्र परिवार उपस्थित होते.

