1 min read

मंडल आयोग अंमलबजावणी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरला धरणे आंदोलन

Loading

मंडल आयोग अंमलबजावणी दिनानिमित्त धरणे आंदोलन

मंडल आयोग अंमलबजावणी दिनानिमित्त धरणे आंदोलन

दि.23 ऑगस्ट2023 ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी भारतीय पीछडा(ओबीसी) शोषित संघटन च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 13 ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोगाची अंमलबजावणी प्रधानमंत्री विश्वनाथ प्रतापसिंग यांनी केली या दिनाचे निमित्त साधून हे धरणे आंदोलन ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही 3743 जातीमध्ये विभागलेल्या ओबीसी समाजाची जात नाही जनगणना होत नाही त्यामुळे या समुदायासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात व आरक्षण निश्चिती करण्यात अनेक अडचणी येतात .याकरिता ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी. मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करावी. केवळ ओबीसी करता असलेली घटनाबाह्य क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी. ओबीसींचा शासकीय निमशासकीय नोकऱ्यातील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा. इत्यादी प्रमुख मागण्या करण्यात आल्या याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस जी माचनवार, विभागीय अध्यक्ष प्रा सुदाम चिंचाणे विभागीय महासचिव डॉ कालिदास भांगे जिल्हा सचिव डॉ देवराज दराडे महानगराध्यक्ष डॉ वसंत हारकळ,ओबीसी विचारवंत स सो खंडाळकर ,मंडल आयोग लागू करण्यात मा.शरद यादव,लालूप्रसाद यादव, कांशीरामजी यांचे प्रचंड योगदान असल्याचे सुशीलताई मोराळे यांनी सांगितले. सरस्वती हरकळ,ऍड महादेव आंधळे, प्रा गोरे,विजय महाजन, शरद बोरसे,निशांत पवार,विलास ढंगारे,संदीप घोडके, सुरेश आगलावे, अंबादास रगडे, डॉ ज्ञानदेव घुगे, अमोल वाघमारे ,विष्णू वखरे,,प्रकाश मालकर ,डॉ विश्वनाथ कोक्कर,वैजनाथ शिंदे, संतोष काळे, सुरेखा आढागळे,प्राचार्य ग ह राठोड, व्यंकटराव आहेर, संजय गादीवार, मुस्तगीर बेलदार, तुषार अहिरे,डॉ गजानन श्रीमंगले ,राजपाल सिंह राठोड ,इत्यादींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *