1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा संपन्न

Loading

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे यांच्यामार्फत अखिल भारतीय राजभाषा हिंदी विभूषण, हिंदी विशारद ,हिंदी रत्न परीक्षा महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव
तालुका अमळनेर येथे घेण्यात आली.
महात्मा फुले स्कूल देवगाव येथे हिंदी राष्ट्रभाषा यांच्यामार्फत परीक्षेला गेल्या बारा वर्षापासून विद्यार्थ्यांना बसवण्यात येत होते. या वर्षापासून महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे यांच्यामार्फत परीक्षेला बसवण्यात आले आहे. परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक बक्षिसे व सन्मानपत्र महात्मा गांधी राजभाषा प्रचार संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे असे आयोजकांनी कळविले आहे.
देवगाव देवळी येथील महात्मा फुले स्कूल मध्ये इयत्ता आठवी नववी व दहावीचे 67 विद्यार्थी परीक्षेला बसले. परीक्षा शांततापूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली हिंदी परीक्षेला मार्गदर्शन मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. तर हिंदी विषय प्रमुख व परीक्षेचे आयोजन ईश्वर महाजन यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन करून तणावमुक्त परीक्षा कशी देता येईल या संदर्भामध्ये माहीती दिली.
हिंदी परीक्षा यशस्वी करण्यासाठी शाळेचे स्काऊट शिक्षक एच ओ माळी, एस के महाजन व क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *