महिलांवरील अत्याचार महाराष्ट्रात तरी खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत धुळ्यात महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या सेवा ऑटो च्या मॅनेजरला शिवसेनेकडून शिवसेना स्टाईल समज
![]()

महिलांवरील अत्याचार महाराष्ट्रात तरी खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत धुळ्यात महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या सेवा ऑटो च्या मॅनेजरला शिवसेनेकडून शिवसेना स्टाईल समज
धुळे येथील सेवा ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी महिलांनी मॅनेजर कडून खेळखणी होत असल्याची लेखी तक्रार शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्याकडे केली होती त्याची तात्काळ दखल घेत धुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी आज सदर वाहन विक्री कंपनीत जाऊन तेथील मॅनेजरला शिवसेना स्टाईल मध्ये कडक समज दिली याप्रसंगी तक्रारदार महिला देखील उपस्थित होत्या यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख यांनी महाराष्ट्रात तरी व विशेषता धुळ्यात महिलांवरील अत्याचार अत्याचार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत यापुढे जर असा प्रकार घडला तर शिवसेना स्टाईल मध्ये प्रसाद दिला जाईल असे सांगत सदर मॅनेजर वर तात्काळ कारवाई करण्याची मागणी कंपनीच्या प्रोप्रायटर कडे केली