1 min read

नशिराबाद येथे जिल्हा परिषद शाळेत दप्तर वाटप

Loading

नशिराबाद येथे जिल्हा परिषद शाळेत दप्तर वाटप
नशिराबाद येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये विद्यार्थ्यांना लोकसहभागातून दप्तर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी भरत कोसोदे होते.प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी सपकाळे, गट शिक्षणाधिकारी फिरोज पठाण, पोषण आहार अधीक्षक खलील शेख, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार,शिक्षण विस्तार अधिकारी सरला पाटील,केंद्र प्रमुख प्रकाश तिडके उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांनी शिक्षकांना गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.आभार मुख्याध्यापक केशव पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक इरफान तडवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जगन कोळी, केशव पाटील,इरफान तडवी उपशिक्षक प्रमोद केळकर, मनोज चौधरी यांनी सहकार्य केले.सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *