1 min read

खेडी येथे कृषीदुतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Loading

खेडी येथे कृषीदुतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषीदूत हेमंत गोडसे, निखिल ढवळे, ओम गपाट, सौरभ भगत, विराज बोरुडे, संकेत शिंदे यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खेडी गावात गावसर्वेक्षण केले. सरपंच, ज्ञानदेव देवराव पाटील, उपसरपंच भास्कर गंगाराम पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी कृषीदुतांचे चे स्वागत केले. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. सी.डी. देवकर, डॉ.पी.डी.सोनवणे, डॉ.जी.बी. काबरे, डॉ.वी.एस. गिरासे, डॉ. एस. डी.पाटील, डॉ.एस.पी.पोळ,डॉ. व्ही.वाय. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत हे गावातील पीक लागवड पद्धती, आधुनिक शेती माहिती, बळीराजाला वित्तीय मदत पुरवण्याची माहिती व पीक प्रात्यक्षिक तसेच इतर शेती संबंधी माहिती व मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *