प्रताप महाविद्यालयातील डॉ. निलेश पवार यांची रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी नियुक्ती
![]()

डॉ. निलेश पवार यांची रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी नियुक्ती
अमळनेर : येथील रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखपदी प्रा.डॉ. निलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, सी.ए. नीरज अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी.जैन सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, माजी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयेश गुजराथी हे उपस्थित होते.
डॉ. निलेश पवार यांनी रसायनशास्त्र विषयात एम.एस्सी (औद्योगिक रसायनशास्त्र), पीएच.डी. (रसायनशास्त्र) व रिसर्च असोसिएट (ICAR Institute, Mumbai) ह्या उच्च मानल्या जाणाऱ्या पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयासाठी एम.फील व पीएच.डी. साठी मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत आठ एम. फिल, सहा पीएच.डी च्या विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी १७ पाठ्यक्रम पुस्तकेही रसायनशास्त्र व अभियांत्रिकी विषयात व ७२ शोधनिबंध हे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रकाशित केले आहेत. विद्यापीठाच्या विविध समित्यांवरही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना हा राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे त्यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना व प्रताप महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना असा मान त्यांनी प्रताप महाविद्यालयास प्रथमतः मिळवून दिलेला आहे.
विभागप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन,उपप्राचार्य डॉ. जी. एच. निकुंभ, डॉ. जयेश गुजराथी, डॉ. कल्पना पाटील, डॉ.जयंत पटवर्धन, प्रा.पराग पाटील, डॉ.विजय मांटे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

