झंझावात गौरव ग्रंथाचे उदया प्रकाशन, गौरव सोहळा आणि विचार मंथन
![]()


झंझावात गौरव ग्रंथाचे प्रकाशन, गौरव सोहळा आणि विचार मंथन
जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते तथा नेते आयुष्यमान मुकुंद सपकाळे यांच्या एकसष्ठी पूर्ती निमित्त डॉ.मिलिंद बागूल संपादित ‘झंझावात’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आज ५/३/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात संपन्न होणार आहे.
सामाजिक चळवळीमध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध लढताना वयाची चाळीस वर्षे समर्पित केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे दर्जेदार लेख मान्यवरांकडून लिहून ,त्या लेखांचे संपादन डॉ.मिलिंद बागुल यांनी केलेले आहे. सदर ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात एकसष्ठी पूर्ती निमित्त आयु.मुकुंद सपकाळे यांचा सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन नागरी सन्मान करण्यात येणार आहे.गौरव सोहळ्याच्या निमित्ताने ने विचारमंथनाचा वैचारिक मेजवानीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत तथा पत्रकार उत्तम कांबळे असणार आहेत. या ग्रंथाचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यकर्त्याच्या वाटचालीचा मागवा घेणारे व्याख्यान पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ.मनोहर जाधव घेणार आहेत.
आयु. मुकुंद सपकाळे गौरव समितीचे अध्यक्ष ॲड.राजेश झाल्टे यांनी या कार्यक्रमाची धुरा खांद्यावर घेतलेली आहे. याप्रसंगी सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांना उपस्थिती देण्याचे आवाहन प्रतिभा शिंदे, करीम सालार, सचिन धांडे, राम पवार, जयसिंग वाघ, डॉ. मिलिंद बागुल, प्रा. डॉ.सत्यजित साळवे, बापूराव पानपाटील, दिलीप सपकाळे, विनोद अहिरे या गौरव समितीच्या सदस्यांनी केले आहे.

