हरित चाळीसगांव चषक-२०२३ ह्या वृक्षसंवर्धन स्पर्धेला सुरुवात
![]()
हरित चाळीसगांव चषक-२०२३ ह्या वृक्षसंवर्धन स्पर्धेला सुरुवात
चाळीसगांव तालुक्यातील पर्यावरणप्रेमींनी सहभागी होण्याचे जलमित्र परिवारातर्फे आवाहन

शाळेतील मुलांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे सन २०२० पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी हरित चाळीसगांव चषक या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठीच्या ह्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मिळत असलेला छान प्रतिसाद बघता परिसरातील इतरही वृक्षप्रेमींना वृक्षसंवर्धनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी ह्यावर्षी पासून ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित न ठेवता इतर सर्व वयोगटातील पर्यावरणप्रेमींसाठीही खुली करण्याचा निर्णय जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे घेण्यात आलेला आहे.
आपल्याला स्थानिक झाडांची माहिती व्हावी, झाडांचे फायदे समजावेत यासाठी सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धकांच्या झाडाची सर्वांगीण वाढ विचारात घेऊनच त्यांना बक्षीस दिले जाईल.
हरित चाळीसगांव चषक स्पर्धेची बक्षीसे खालील प्रमाणे
पुरुष गट:
प्रथम:-
कै.डॉ. ज्ञानेश चवात, अमरावती यांच्या स्मरणार्थ
हरित चाळीसगांव चषक ट्रॉफी, २००० रु. रोख व प्रमाणपत्र
द्वितीय:- (दोन बक्षिसे)
कै.सौ. रत्नाबाई जगन्नाथ मालपुरे, वाघळी यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी, १००० रु. रोख व प्रमाणपत्र
तृतीय:- (तीन बक्षिसे)
कै. उदयसिंग मोहनसिंग शिसोदे, कुंझर यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी, ५०० रु. रोख व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ:- (चार बक्षिसे)
कै. सत्यवान दगडू जाधव, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी व प्रमाणपत्र
महिला गट:
प्रथम:-
लोकनायक स्व. तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
हरित चाळीसगांव चषक ट्रॉफी, २००० रु. रोख व प्रमाणपत्र
द्वितीय:- (दोन बक्षिसे)
कै. दादासाहेब गोविंदराव मोहनराव भालेराव, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी, १००० रु. रोख व प्रमाणपत्र
तृतीय:- (तीन बक्षिसे)
कै. सत्यनारायण गोवर्धन दायमा सर, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी, ५०० रु. रोख व प्रमाणपत्र


उत्तेजनार्थ:- (चार बक्षिसे)
कै. राजेंद्र सोमनाथआप्पा रुईकर (बापु रुईकर), चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी व प्रमाणपत्र
स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
हरित चाळीसगांव चषक स्पर्धेचे नियम:-
१) या स्पर्धेसाठी फक्त भारतीय प्रजातीची देशी झाडेच लावावी लागतील.
२) या स्पर्धेत जास्तीत जास्त दोन फुटांपर्यंत झाडे लावावीत.
३) सहभागी होणाऱ्या स्पर्धकाने झाडाशेजारी उभे राहून नोटकॅम हे ऍप्लिकेशन वापरून लोकेशन सहितच फोटो अपलोड करावा.
४) फोटोसोबत आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, लावलेल्या देशी झाडाचे नाव व ठिकाण नमूद करावे.
५) शक्यतो लावलेल्या झाडाविषयीची थोडी माहिती स्वहस्ताक्षरात लिहून त्याचाही फोटो पोस्टमध्ये टाकावा.
६) निकालासाठी १५ एप्रिल २०२४ ते १५ मे २०२४ यादरम्यान पुन्हा झाडाचा लोकेशन सहित फोटो अपलोड करावा लागेल.
७) झाड लावतानाचा फोटो ज्या ठिकाणावरून काढलेला असेल त्याच ठिकाणावरून निकालासाठीचा फोटोही काढायचा आहे.
८) आपण ही झाडे कोठे पण लावावीत आपल्या अंगणात, आपल्या परिसरातील ओपन स्पेसेस मध्ये, शेतात, डोंगरावर आपल्याला योग्य वाटेल तिथे.
९) ह्या स्पर्धेत कुठल्याही वयोगटाची व्यक्ती सहभागी होऊ शकते.
१०) स्पर्धेसाठी फक्त चाळीसगांव तालुक्यात केलेली वृक्षलागवडच गृहीत धरण्यात येईल.
११) झाडाची सर्वांगीण वाढ पाहूनच बक्षीस दिले जाईल व त्याबाबतीत परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
१२) स्पर्धेसंदर्भातील इतर सर्व सूचनांची माहिती वेळोवेळी हरित चाळीसगांव चषक या फेसबुक ग्रुपवर व जलमित्र परिवार चाळीसगांव या फेसबुक पेजवर दिली जाईल.
हरित चाळीसगांव चषक स्पर्धेसाठी लावलेल्या झाडासोबतचा आपला फोटो NoteCam Lite – photo with notes हे ऍप्लिकेशन वापरूनच काढावा ज्यात त्या जागेचे जीपीएस लोकेशन स्पष्टपणे दिसेल, तसेच तो फोटो फेसबुक ग्रुपवर अपलोड करताना पोस्टमध्ये खालीलप्रमाणे माहिती द्यायची आहे.
हरितचाळीसगांवचषक
१) स्पर्धकाचे संपूर्ण नाव:-
२) पत्ता:-
३) व्हाट्सअप संपर्क क्रमांक:-
४) लावलेल्या देशी झाडाचे नाव:-
५) झाड लावलेल्या ठिकाणाचा पत्ता:-
६) त्या झाडाविषयीची थोडी माहिती स्वहस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो जोडला तर अधिक उत्तम
स्पर्धकांनी झाडासोबत काढलेला फोटो व ईतर सर्व माहिती हरित चाळीसगांव चषक
(https://www.facebook.com/groups/GreenChalisgaonTrophy/) या स्पर्धेच्या फेसबुक ग्रुप वर शेअर करावी.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ ही आहे. अधिक माहितीसाठी ९८५००८२००६, ९४२०३८२६१० या क्रमांकांवर संपर्क साधावा.
स्पर्धेचा उद्देश केवळ वृक्षसंवर्धनाला चालना देणे हाच आहे.

