महसूल सप्ताह निमित्त भिवंडीत युवासंवाद कार्यक्रमाचे आयोजन , 300 विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले वाटप.
![]()

महसूल सप्ताह निमित्त भिवंडीत युवासंवाद कार्यक्रमाचे आयोजन , 300 विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले वाटप.
ठाणे,भिवंडी दि.३(मनिलाल शिंपी)
महाराष्ट्रात सुरू असलेल्या महसूल सप्ताह निमित्त भिवंडी तहसीलदार कार्यालया मार्फत भिवंडी शहरातली कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या जे एम मोमीन गर्ल्स महाविद्यालया त युवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर,उपविभागीय अधिकारी अमित सानप,भिवंडी महानगर पालिका आयुक्त अजय वैद्य,तहसीलदार अधिक पाटील,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,
युवकांशी संवाद साधणारे वक्ते अतिश कुलकर्णी,शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे,कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तल्हा फक्की,
प्राचार्या डॉ तबस्सूम शेख आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील 300 हून अधिक विद्यार्थिनींना तहसीलदार कार्यालया कडील रहिवासी दाखले देण्यात आला.या सोबत ज्या मुलांचे मातापिता यांचे निधन झाले आहे अशा अल्पवयीन बालकांना अनाथ दाखला,संजय गांधी निराधार योजना चे लाभार्थी यांना दाखले वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमात महसूल विभागाच्या माहिती सोबत मतदार नाव नोंदणी बाबत विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सोप्या भाषेत उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर,आदेश म्हात्रे,मंडळ अधिकारी शैलेश भोजने, सुधाकर कामडी, अतुल नाईक, तसेच सर्व सजातील तलाठी यांनी विशेष मेहनत घेतली.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक पाटील यांनी केले.

