अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये
फॅन्सी ड्रेस स्पर्धा..
![]()

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये
फॅन्सी ड्रेस स्पर्धा..
अमळनेर प्रतिनिधी
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये 3१ जुलै 2023 रोजी ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत चिमुकल्यांनी (Nur, Jr kG, Sr kG) ‘स्वातंत्र्य सैनिक’ यांची वेगवेगळी भूमिका निभावली. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, यांची भूमिका साकारून वेशभुषेत ब्रिदवाक्य बोलून दाखवले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सेक्रेटरी प्रा. श्याम पाटील, प्राचार्य निरज चव्हाण, उपप्राचार्य आश्विनी चौधरी, हेडमिस्ट्रेस मंगला चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्या त्याचप्रमाणे पालकवृंद उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे निरीक्षक सौ. अश्विनी मॅडम व श्री. चेतन शर्मा सर होते.
स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून अनुक्रमांक पटकवलेले विद्यार्थी- Nursery मधुन इशिका शरद खैरनार हिने प्रथम क्रमांक तर हिमांशी प्रकाश पंजवानी हीचा द्वितीय क्रमांक आला. LKG-A मधून ऐंजल सचिन महाजन हीचा प्रथम क्रमांक तर आरोही अविनाश पवार द्वितीय क्रमांकावर आली. LKG-B मधुन वेदांत सुमित पवार प्रथम क्रमांक तर यक्षित प्रशांत चव्हाण द्वितीय क्रमांकावर आला. UKG मधुन देवांश संदिप पाटील प्रथम क्रमांक तर फरहानशा सुलतानशा फकिर याने द्वितीय क्रमांकावर स्थान पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांना पालकांसमवेत शिक्षकांचे योग्य ते मार्गदर्शन लाभले. शाळेच्या वतीने सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व सांगता श्री. विलास पाटील सर यांनी केले.

