राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहादा शहराध्यक्षपदी रेश्मा पवार यांची निवड
![]()

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहादा शहराध्यक्षपदी रेश्मा पवार यांची निवड
शहादा (प्रतिनिधी) : शहरातील रेश्मा भुरा पवार यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहादा शहराध्यक्ष पदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी पक्षाकडून नवनियुक्त्या करण्यात येत आहे. जिल्ह्यात नव्याने संघटना बांधणी सुरू झाली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहादा शहराध्यक्ष पदी रेश्मा पवार यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रेश्मा भुरा पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. रेश्मा पवार हे मुळचे शहादा येथील आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. गावात सामाजिक कार्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना जिल्ह्यातील महिलांचे नेतृत्व करण्याची पक्षाने संधी दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे. निवडीनंतर बोलताना रेश्मा पवार म्हणाले, पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडीन. शहरातील महिलाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी भविष्यकाळात काम करेन. सदैव पक्षहितासाठी कार्यरत राहू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, जि. प. सदस्य मोहन शेवाळे, सुरेंद्र कुवर, माधव पाटील, सीमा सोनगरे, उषा तायडे, संगीता पाडवी, आदी मान्यवर उपस्थित होते.

