1 min read

जळगाव शहर आम आदमी पार्टीकडून समाजसुधारक,लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Loading

जळगाव शहर आम आदमी पार्टीकडून समाजसुधारक,लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे शिलेदार कष्टकरी मजुरांची लढाई लढणारे, रशिया सारख्या देशात जाऊन भारताचे नाव लौकिक वाढवणारे समग्र क्रांतीचे स्वप्न घेऊन चळवळ चालवणारे दीड दिवस शाळा शिकून 35 कादंबऱ्या तीन प्रवास वर्णन साथहून अधिक नाटके एवढा मोठा लिखाण प्रपंच मराठी साहित्य क्षेत्रातील साहित्य सम्राट महाराष्ट्रासाठी भूमिगत होऊन डफ हाती घेऊन आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे आपल्या लिखाणातून वंचित घटकात राहणाऱ्या नायक व नायिका व्यवस्थेची कशा प्रकारे लढतात त्या लढण्यातून अनेक सत्य घटना मांडणारे प्रबोधनकार लेखक कवी अशा एक ना अनेक भूमिका साकारणारे कॉम्रेड लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती आज जळगाव शहर आम आदमी पार्टी कडून साजरी करण्यात आली आहे
ह्या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी,महानगराध्यक्ष योगेश हिवरकर,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अमृता नेतकर,मिलिंद दादा चौधरी,मीडिया प्रमुख योगेश भोई,सल्लागार डॉ सुनिल गाजरे सर,डॉ नारायण आटकोरे, अनिल वाघ सर, रईस कुरेशी,adv विजय दाणेज,सोनल तिवारी,सरिता तायडे, माधवराव जाधव,ओम प्रकाश अग्रवाल,पवन खबायत,
ईत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *