1 min read

महसूल दिनी पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बी.एल.ओ.पुरस्कार प्रदान !….

Loading

महसूल दिनी पी.डी.पाटील यांना उत्कृष्ट बी.एल.ओ.पुरस्कार प्रदान !….

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगांव – तहसील कार्यालय धरणगाव येथे एक ऑगष्ट महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी होते. महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने पदाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील आदर्श शिक्षक व यादी भाग क्रमांक 194 धरणगाव चे बी एल ओ पी डी पाटील यांना उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार देऊन तहसीलदार व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पी डी पाटील यांचे मोठा माळीवाडा या प्रभागातील यादी भाग क्रमांक 194 चे उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मला सलग दोनदा तहसील कार्यालयाने हा आदर्श बी.एल. पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याच्याने माझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे असे प्रतिपादन पी डी पाटील यांनी केले याप्रसंगी तहसीलदारसो. महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, निवडणुक विभाग प्रमुख देवराज साहेब तसेच तहसील कार्यालयातील सर्व सन्माननीय पदाधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *