1 min read

अखेर वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक
(माध्यमिक) जळगांव यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Loading

अखेर वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक
(माध्यमिक) जळगांव यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)चे सचिव एस.डी.भिरूड यांची माहिती

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक
(माध्यमिक) जळगांव यांनी दिले.
वेतन पथक अधिक्षक राजमोहन शर्मा यांनी प्रलंबित कामांबाबत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आज आयोजित केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव शालिग्राम भिरूड यांनी सांगितले.
सविस्तर माहिती अशी की महाराष्ट माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन ) सचिव मा.श्री. एस.डी. भिरुड सर जळगांव यांचे दिनांक २६/०७/२०२३ च्या पत्राच्या अनुषंगाने ठिया अदोलनातील अश्वासने दिनांक ३१/०७/२०२३ रोजी माध्यमिक शिक्षक संघटना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटन व शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भ.नि.नि. तसेच ना परतावा थकीत बीले ,रजा रोखीकरण व वैद्यकीय देयकेबाबत झालेल्या ठिया अंदालनाच्या अनुषंगाने खालील प्रकरणाची निर्णयाची कार्यवाही करण्याचा सर्वांच्या उपस्थितीत निर्णय झाला माहे जून अखेर प्राप्त भ.नि.नि. प्रस्ताव आठ दिवसात पूर्ण करुन त्याचा लाभ संबधीत
कर्मचाऱ्यांना देण्यात यावा.
१) रजा रोखीकरणाची देयके उद्या दिनांक ०१/०८/२०२३ रोजी कोषागार कार्यालयात सादर करुन उर्वेरित राहिलेली देयके तयार करुन तात्काळ कोषागारात सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
२) दुसरा हप्ता प्रलंबीत देयके संबधीत कर्मचारी यांच्या खात्यात आठ दिवसाच्या आत जमा करण्यात येईल.
३) वैद्यकीय देयके आठ दिवसात कोषागारात सादर करणे
४) थकीत देयकाच्या सन २०१९-२० ते २०२२-२३ पर्यंतच्या मंजूर झालेल्या यादया व पारित
झालेल्या देयकाच्या प्रती महाराष्ट माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन ) सचिव मा.श्री.एस.डी. भिरुड सर जळगांव यांच्याकडे देण्यात याव्यात असे लेखी आश्वासन अधीक्षक
वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक
(माध्यमिक) जळगांव यांनी दिले.
ठिय्याआंदोलनाला प्रमुख उपस्थिती एस्.डी.भिरुड, जे.के.पाटील, एच्.जी.इंगळे , प्रा.सुनिल गरुड, नंदन वळींमकर, शैलेश राणे, जी.आर्.चौधरी, साधना लोखंडे, आर.डी.निकम, संजय वाघ, आर्.सी.पाटील, धनपाल सर, अतुल इंगळे, डिगंबर पाटील, डी.ए.पाटील, सिद्धेश्वर वाघुळदे, अजित पाटील, कैलास चौधरी, सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *