अमळनेरात राबविला जाणार “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” उपक्रम
![]()
अमळनेरात राबविला जाणार “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी- नियमित शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण “व्यक्तिमत्व विकास” व्हावा, या पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दर शनिवारी “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे (नागपूर) व मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त मधुकर पाटील, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, खा शि मंडळाचे माजी कार्याध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय भदाणे, खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ एस. आर. चौधरी, निवृत्त उपप्राचार्य डॉ एस.ओ माळी, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, नोबल फाउंडेशन चे अध्यक्ष जयदीप पाटील, खा शि मंडळाचे संचालक सी ए नीरज अग्रवाल, युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे आदी उपस्थित होते. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. डी ए धनगर यांनी आभार मानले.

चौकट
असा असेल उपक्रम…!

