1 min read

अमळनेरला गजानन महाराज मंदिरात अधिक मास निमित्ताने पोथी वाचन समाप्ती  व वान दान व अन्नदान कार्यक्रम संपन्न

Loading

मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

अमळनेरला गजानन महाराज मंदिरात अधिक मास निमित्ताने पोथी वाचन समाप्ती व वान दान कार्यक्रम संपन्न

मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेरला जीएम सोनार नगर येथील गजानन महाराज मंदिरात अधिकमासानिमित्ताने पोथी वाचन पंधरा दिवस निरंतर करत आज समाप्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंदिरातील सेवेकरी अशोक भावे व नितीन भावे यांना अधिकमास निमित्ताने वानदान लावले.. महाराजांचा आशीर्वाद घेतला.. गजानन महाराज मंदिरात सकाळपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत गजानन भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती..
सविस्तर माहिती अशी कि या अधिक महीन्यात दिपदानाला मोठे महत्व आहे. अधिकमासात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते. पुरुषोत्तम मासात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात. म्हणून संत गजानन महाराज मंदिरात अनेक महिलांनी अधिक मासा यानिमित्ताने महाराजांना वान लावले.
धार्मिक श्रद्धेनुसार, अधिक मासामध्ये ध्यान, जप, तपस्या, योगासने करणे खूप फलदायी असते. धर्मग्रंथानुसार पृथ्वीवरील सर्व सजीवांची निर्मिती ही पाच तत्वांनी बनलेली आहे. या पाच तत्वांमध्ये जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी यांचा समावेश होतो. या महिन्यात प्रत्येक जीव आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयत्नांनी आपला शारीरिक आणि आध्यात्मिक विकास साधतो. कुंडलीतील दोषही या महिन्यात सुधारतात. या दरम्यान दरम्यान कुंडलीतील कमजोर ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात असे नितीन महाराज यांनी सांगितले आहे.
संत गजानन महाराज मंदिरात संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक आर बी पवार, महिला वारी प्रमुख ज्योती पवार,सेवेकरी रघुनाथ महाराज व सर्व गजानन भक्त बंधू भगिनी यांनी मंदिराचा कार्यक्रम समाप्तीसाठी मोठे सहकार्य केले. जेवणाच्या मेनूची अत्यंत चांगली व्यवस्था मातोश्री टेन्टचे मालक विनोद पाटील यांनी केलेली होती.

पोथी समाप्ती वाण दान व अन्नदान कार्यक्रमातील काही क्षणचित्रे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *