गडखांब केंद्राची शिक्षण परिषद पातोंडा जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संपन्न..
![]()





गडखांब केंद्राची शिक्षण परिषद पातोंडा येथे उत्साहात संपन्न..
अमळनेर प्रतिनिधी- जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा पातोंडा तालुका अमळनेर येथे गडखांब केंद्राची पहिली शिक्षण परिषद संपूर्ण वातावरणात संपन्न झाली..
व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील सोनवणे होते तर प्रमुख अतिथी
देवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सोनवणे, शिक्षण परीषदेचे आयोजक मुख्याध्यापक किशोर पाटील, राजेंद्र बागुल,देवगाव देवळी महात्मा फूले हायस्कूलचे
शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन होते..
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. अतिथींचे स्वागत शाळेतील चिमुकल्यांनी स्वागतगीताने करत प्रमुख अतिथीचा बुके व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले.शिक्षण परिषदमध्ये विद्या समीक्षा व स्वच्छता मॉनिटर या संदर्भामध्ये सविस्तर माहिती कमलेश मोरे यांनी सांगितली तर विद्या प्रवेश संदर्भात सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. वैशाली लोखंडे यांनी पाठ्यपुस्तकातील कोरे पान या विषयावर सविस्तर चर्चा केली तर सेतू अभ्यास व निपुण चाचणीच्या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन विठ्ठल पाटील यांनी केले..
अध्यक्षीय भाषणात सुनील सोनवणे म्हणाले की गडखांब केंद्राची पातोंडा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण परिषद पहिली घेण्याचा मान मिळाला. गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील व ज्ञानेश्वर पाटील केंद्रप्रमुख यांचे धन्यवाद व्यक्त केले. सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी विद्यार्थ्यांकडून सोडून आपले काम वेळेत करावे व निपुण चाचणीचीही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घ्यावी . आपले सर्व कागदपत्रे अद्यावत ठेवावे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी योगदान द्यावे असे अध्यक्षीय भाषणात यांनी सांगितले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश मोरे यांनी केले तर यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक प्रतिभा बोरसे, विजय पवार खेमचंद पाटील ,अनिल लोहार, विठ्ठल पाटील ,सुवर्णा नीळ केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शेवटी श्रद्धा पाटील यांनी मानले..

