1 min read

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे कवी गणेश आघाव यांची भेट

Loading

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे कवी गणेश आघाव यांची भेट

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी ता. मुक्ताईनगर येथे देवाची आळंदी येथील कवी गणेश आघाव यांनी नुकतीच भेट दिली
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विदयालयाचे ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर होते. प्रसंगी शिक्षक श्री एस. एस. नागे यांनी प्रास्ताविक करून कवी आघाव यांचा परिचय करून दिला कवी गणेश आघाव हे बालभारती पुणे चे अभ्यास मंडळ सदस्य सुद्धा आहेत यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित असून पोरी निघाल्या शाळेला या कवितेचे 32 भाषांमध्ये भाषांतर झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या विविध कविता जपान मध्ये अभ्यासक्रमात सुद्धा समाविष्ट आहेत कवी आघाव यांचा विद्यालयाचे वतीने ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी शाल व गुलाब बुके देऊन सत्कार केला प्रसंगी शिक्षक श्री आर.पी. राठोड श्री एस. के. पाटील शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी कवी गणेश आघाव यांनी आपल्या स्वरचित सुंदर चाली मध्ये विद्यार्थ्यांना कविता गाऊन दाखवल्यात प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात रहा, शेतीच्या सानिध्यात रहा आणि पुस्तकांच्या सानिध्यात रहा असा मोलाचा संदेशही दिला त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सुळे येथील श्री सोपान पाटील सुद्धा उपस्थित होते त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांनी इयत्ता दहावीची कु. अनुजा गावंडे हिला काव्यसंग्रहाचे पुस्तक सुद्धा भेट दिले रवी गणेश आघाव यांची भेट विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ.उज्जैनकर यांनी घडवून आणली शेवटी श्री एस. के. पाटील सर यांनी आभार प्रकट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *