डॉ.निकिता मराठे एम. एस. सर्जन परीक्षेत उत्तीर्ण
![]()

डॉ.निकिता मराठे एम. एस. सर्जन परीक्षेत उत्तीर्ण
मुक्ताईनगर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एन.जी. मराठे यांची सुकन्या डॉ. निकिता मराठे नुकत्याच झालेल्या मे जूनच्या परीक्षेत एम. एस. जनरल सर्जन म्हणून पहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण झाली श्रम व चिकाटीच्या जोरावर ती या येशोशिखराला जाऊन पोहोचली तिला घरातूनच डॉ.एन. जी. मराठे यांचे मार्गदर्शन लाभले डॉ.मराठे हे तालुक्यातील पहिले एम डी. हृदयरोग तज्ञ आहेत त्यांची सेवा गायत्री हॉस्पिटलच्या माध्यमातून मुक्ताईनगरला असंख्य रुग्णांना त्यांनी जीवदान दिलेले आहे त्यांचे डॉ. निकिता हिला वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन लाभले डॉ. निकिता हिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व सत्कार होत आहेत पुढे वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी साऊथ कोरिया देशात जाण्याचा तिचा मानस आहे तिच्या यशाबद्दल नुकताच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर यांनी डॉ.निकिता मराठे यांचा सवाल व गुलाबोके देऊन नुकताच सत्कार केला.

