प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र यांचे उद्घाटन
![]()


आज दिनांक 27/07/2023 रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र यांचे उद्घाटन मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झाले. यानिमित्त मसुर येथील प्रधानमंत्री समृध्दी केंद्र येथे लाईव्ह मार्गदर्शन दाखविण्यात आले सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र कृषी महाविद्यालय येथे करण्यात आले याप्रसंगी. सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी तसेच भाजपा महानगराध्यक्ष श्री गजेंद्र भाजपा सरचिटणीस खंडेलवाल यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राजमाने अग्रो फार्मेर प्रोडूसर कंपनी लिमिटेड- अध्यक्ष तुषार राजमाने आणि शेतकरी कृषी सेवा केंद्र -शंकर पवार यांनी आपापल्या केंद्रावर कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी मा दिपाली ताई खोत भाजपा सातारा जिल्हा सचिव यांनी शेतकऱ्यांना अशी माहिती दिली की, प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक सर्व बी बियाणे, खते, अवजारे, पीक विमा, औषधे, माती परीक्षण अश्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना लागणारे सर्व साहित्य एकच छताखाली मिळावे आणि शेतकऱ्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र गावोगावी, तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर बनवण्यात येत आहेत. महापौर सौ प्रतिभाताई चौधरी ,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र अपंळकर, यावेळी राजमाने कृषी प्रोड्युसर कंपनीचे मा मल्लिकार्जुन राजमाने यांचा सत्कार मा सुनील दळवी दादा भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष आणि मा जयवंत जगदाळे काका तालुका उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला.
शेतकरी कृषी सेवा केंद्राचे मा शंकर पवार यांचा सत्कार मा अनिकेत कांबिरे तालुका उपाध्यक्ष भाजपा आणि मा बाबुराव चौधरी बापू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खालील कृषी अधिकरी हजर होते. श्री राहुल देसले, प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, धुळे कुरबान तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे नवनाथ कोळपकर, प्रकल्प संचालक, आत्मा धुळे विनय बोरसे, उप प्रकल्प संचालक, आत्मा धुळे डॉ. दिनेश नांद्रे, समन्वय, कृषि विज्ञान केंद्र, धुळे डॉ.श्रीधर देसले शास्त्रज्ञ, धुळे डॉ. पकंज पाटील, शास्त्रज्ञ डॉ. आतिश पाटील, शास्त्रज्ञ डॉ. रोहित कडू, शास्त्रज्ञ श्री जगदीश काथेपुरी, शास्त्रज्ञ अम्रीता राऊत मॅडम श्री श्रीराम पाटील, कृषी महाविद्यालय प्राचार्य श्री राहुल देसलेसह्याद्री पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री श्रीराम पाटील, चौगाव, तालुका शिंदखेडा हजर होते.

