1 min read

प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील व कविता पाटील सन्मानित..!

Loading

प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील व कविता पाटील सन्मानित..!

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत असलेले प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील व त्यांच्या पत्नी कविता पाटील यांचा ‘कर्तुत्वाचा महासन्मान’ या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.त्यांचा मुलगा डॉ.घनश्याम पाटील हा यूपीएससी ची सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून एअर फोर्स मध्ये नियुक्त झाल्या प्रित्यर्थ नागपूर येथे कार्यरत असलेले आयकर आयुक्त व अमळनेर तालुक्यातील मारवड गावचे सुपुत्र आय.आर. एस. संदीपकुमार साळुंखे व एरंडोल तालुक्यातील ताडे गावचे आय.ए.आय. अधिकारी राजेश पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.या सन्मानाबद्दल संस्थाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री नानासो. विजय नवल पाटील,कार्याध्यक्ष बाळासो.अनिकेत पाटील,संस्थेच्या मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील व प्रा.शाम पवार,प्राचार्य पी.एम.कोळी व स्टाफ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान आर्मी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील हे मराठी विषयात पीएच.डी.करत असून संदीपकुमार साळुंखे यांचे ‘धडपडणाऱ्या तरुणाईसाठी’ व राजेश पाटील यांचे ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे आत्मचरित्र त्यांच्या संशोधनाच्या विषयात संशोधनासाठी आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधत शरद पाटील यांनी आपल्या संशोधनाचा संकल्पित आराखडा यावेळी दोघेही लेखकांना सादर केला.आपल्या पुस्तकावर कोणीतरी पीएच.डी.करत आहे याचा दोघांनाही मनस्वी आनंद झाला. पुढील संशोधन कार्यासाठी दोघेही लेखकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हा सन्मान सोहळा अमळनेर नगरीच्या लौकिकात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाला.यावेळी अनेक यूपीएससी,एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या तरुण-तरुणींचा सन्मान करण्यात आला.या सोहळ्याचे आयोजन अमळनेर तालुक्यातील सर्व विकास मंच, अंबरीश टेकडी विकास मंच,साने गुरूजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, शिवशाही फाउंडेशन, प्रताप तत्वज्ञान केंद्र, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, सीसीएमसी प्रताप कॉलेज अमळनेर. माजी प्रतापियन्स प्रबोधिनी यांनी केले होते.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *