आमराई हरवली…
![]()

आमराई हरवली
एके काळी आमच्या आजोळी सांगायची की आपल्या गावातील शेतात आमराई होती ,प्रचंड प्रमाणात आंबे खाण्यासाठी मिळायचे प्रत्येकाच्या शेतात आंब्याचे झाड होती तर काही लोकांची 10/20 गुंठे आंब्याचेच शेत असायचे आम्हाला ही या गोष्टी एकायला खूप आवडायच्या आम्ही लहान असतांना ही आंब्याचे झाडे बांधवरती बघितले आहेत थोड्याश्या प्रमाणत ईलाम म्हणून शब्दचा वापर होत असे तिथे फक्त आंब्याची झाड असायची
आम्ही इलाम मधून आंबे ही आणले आहेत मुडी म्हणजे सोनानी चिडी अस ही बोलायचे नदीच्या काठावर डांगर ,टरबूज त्याकाळी मुबलक प्रमाणत मिळायचे,घरो घरी उन्हाळ्यात आंब्याचा रस पुरणाची पोळी एक दिवसा आड बनवत होते ,पैसा लोकांकडे कमी होता पण निस्वार्थी प्रेम होतं घरोघरी टीव्ही जरी नसला तरी पण एकत्र येऊन टीव्ही बघण्याचा आनंद खूपच वेगळा होता आता हे झालं भूतकाळातील गोष्ट आता वर्तमान जर बघितला जर बघितले तर चित्र खूप बदलेल आहे 2021 मध्ये दिवाळी सणाला घर व गाड्यांना हार बनवण्यासाठी आंब्याची पान हवी होती 12 वर्षांपासून मुबंईत असल्याने गावी फक्त दिवाळी व उन्हाळी सुट्टीत जातो शेतकरी पुत्र असल्याने शेतीशी नाड तुटलेली नाही म्हणूम मला सहज वाटले की इथे कुठे तरी जवळपास कुठे तरी आंब्याचे झाड असतील तर आंब्याची पान सहज मिळतील पण ………..
घरून निघाल्यानंतर जवळ जवळ 3 किलोमीटर अंतरावरती आंब्याचे झाड मिळाले ज्याला आपण मानमोडया म्हणतो म्हणजे छोटा ओढा त्या ठिकाणी आंब्याचे झाड दिसेल आणी मला आनंदच झाला की कमीत कमी एवढे अंतर कापल्या नंतर 1 आंब्याचे झाड मिळाले मनातुन खूप दुःख वाटत होतं ज्या गावाला आमराई म्हणून ओळखल जायायच त्या गावात आंब्याची फक्त पान मिळवण्यासाठी 3 किलोमीटर जावं लागत यात आपला ही दोष आहे आपण विसरलो तंत्रज्ञान आलं आहे आपण सर्व काही विकत घेऊ शकतो लोकांकडे पैसा आहे फळ विकत घेऊ शकतात पण आपल्या मातीतील जे फळ येत येत त्याचा स्वाद कितीतरी पैसे मोजले तरी तो आनंद ,स्वाद ,मिळणार नाही
म्हणून भविष्यात आपल्या गावाची आमराई आपण वाचवू शकलो नाहीत पण नवीन आमराई बनवू शकतो
एक आंब्याचे झाड तरी आपल्या शेतात लावा येणाऱ्या पिढीला परत तो आंब्याचा आमराईचा गोडवा मिळेल…….
शब्दाकंन सुरेश पाटील
प्रभारी मुख्याध्यापक मरोळ मनपा हिंदी माध्य शाळा

