श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, उधना सुरत, गुजरात च्या वतीने आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची ७२८ वी पुण्यतिथी (संजीवन समाधी) सोहळा व गुणवंत विद्यार्थी तसेच पालक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
![]()

श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, उधना सुरत, गुजरात च्या वतीने आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची ७२८ वी पुण्यतिथी (संजीवन समाधी) सोहळा व गुणवंत विद्यार्थी तसेच पालक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला……! (मराठी लाईव्ह न्युज विलास माळी सुरत प्रतिनिधी)
दिनांक- १६ जुलै २०२३ वार- रविवार- उधना, सुरत-गुजरात
थोर मराठी संत कवी, वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ संत, “आमची माळीयाची जात l शेत लावू बागाईत l कांदा, मुळा,भाजी l अवघी विठाबाई माझी ll लसूण, मिरची, कोथिंबीरी l अवघा झाला माझा हरी ll “आपल्या शेतीच्या कामांमध्येच देव शोधणारे,
श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची ७२८ वी पुण्यतिथी संजीवन सोहळा म्हणून दि.१६ जुलै २०२३ वार- रविवार रोजी श्री क्षत्रिय काच समाज सुधारणा मंडळ,७६,७७ आस्तिक नगर, संजय नगरच्या बाजूला, लिंबायत उधना,सुरत, गुजरात येथील समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तरी सदर पुण्यतिथी महोत्सवात खालील प्रमाणे नियोजित कार्यक्रम राबविले गेले.
१) श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पालखी सोहळा
२)”सन्मान विद्यार्थ्यांचा गौरव समाजाचा…..!” या कार्यक्रमा अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार व बक्षिस वितरण कार्यक्रम तसेच माळी समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा
३)श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने भोजन (महाप्रसाद वाटप) कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ (महाराष्ट्र, मध्यप्रदेश,गुजरात) चे माजी अध्यक्ष मा.श्री.काकासो. निळकंठ देवचंद महाजन व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग या स्पर्धा परीक्षेत उत्तम यश संपादन केलेले मा.श्री.आनंदराव आत्माराम माळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे व्यासपीठावर श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, सुरतचे अध्यक्ष मा.श्री.रमेश गंभीर महाजन उपाध्यक्ष मा.श्री.भिकन दगा महाजन ज्येष्ठ समाज बांधव मा.श्री.लक्ष्मण चिंतामण महाजन मा.श्री.भिमराव दौलत महाजन मा.श्री.लक्ष्मण शेनपडू महाजन मा.श्री.रोहिदास शिवराम महाजन तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा गं.भा.विमलबाई तुकाराम महाजन सेक्रेटरी सौ.लताबाई विठ्ठल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे व सर्व समाज बंधू भगिनींचे स्वागत कु. दिव्या नितीन महाजन कु.जिया योगेश महाजन कु.प्रणाली राजेंद्र महाजन कु.कृतिका देविदास महाजन कु.भावना राजू शेलकर कु.सायली मोतीलाल महाजन,कु. वैष्णवी अतुल महाजन या विद्यार्थीनींनी स्वागत गीताने व शुभारंभ गाण्याने केले. सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेचे पूजन,विनम्र अभिवादन व द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली. नियोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा जीवन परिचय तसेच अध्यात्मिक व सामाजिक कार्याविषयी माहिती त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे सुरत जिल्हा संपर्कप्रमुख व गुणगौरव समिती प्रमुख मा.प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सादर केले. त्यानंतर नियोजित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तो म्हणजे “सन्मान विद्यार्थ्यांचा गौरव समाजाचा…..!” या कार्यक्रमा अंतर्गत सन-२०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता १०वी) व उच्चतर माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता १२वी) तसेच डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच मेडिकल फिल्ड मध्ये ७०.००% व त्यापेक्षा जास्त मार्क मिळवून पास झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार व बक्षिस वितरण कार्यक्रम तसेच माळी समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. त्यामध्ये, आपले वतन आपले गाव सोडून सुरत येथे येऊन आपल्या मुलांना गुजराती, मराठी, हिंदी, इंग्रजी, माध्यमात (भाषेत) शिकवून त्यांची अभ्यासात मेहनत करून घेऊन त्यांना चांगले गुण मिळविण्यासाठी प्रेरित केले व आपल्या समाजाचे नाव परप्रांतात राहून मोठे केले. त्यामध्ये,
इयत्ता – १० वी माध्यम- मराठी
1) महाजन प्राची सुरेश- P.R- 99.66% 2) महाजन साहिल प्रविण- P.R- 96.63% 3) माळी मयंक दिलीप- P.R- 88.99% 4) राणे हर्षिता पंकज P.R-87.66%
5) माळी गीतांजली गोपाल- P.R- 74.77% 6) मगरे दक्ष डिगंबर- P.R- 83.45 % इयत्ता – १० वी माध्यम- गुजराती 1) महाजन हितेन नरेंद्र- P.R- 95.18%
2) महाजन सचिन विकासभाई – P.R- 83.22% 3) बाविस्कर ओम नरेंद्र- P.R- 82.22% इयत्ता – १० वी माध्यम- इंग्रजी 1) राणे रिंकल कुणाल- P.R-90.41% इयत्ता – १२ वी कॉमर्स माध्यम- मराठी
1) महाजन प्रणाली राजेंद्र-P.R- 99.41% 2) महाजन पुनम निंबा – P.R- 75.24% इयत्ता -१२ वी कॉमर्स माध्यम- गुजराती 1) माळी स्नेहल राजेश- P.R- 98.46%
2) माळी निधीबेन रश्मिकांत – P.R- 91.43% इयत्ता – १२ वी सायन्स माध्यम- इंग्रजी
1) माळी हिमांशू महेंद्रभाई- P.R- 72.42% Bachelor of education (B.Ed.)
1) महाजन राहुल उखा – (B.Ed.) Med-Eng- 83.06%
2) महाजन रूपाली नरेंद्र – (B.Ed.) Med-Guj 83.06%
Master of Science (M.sc) 1) माळी कुणाल विकास भाई – (M.sc- Mathematics) Med-Eng- 76.30%
Bachelor of computer application (B.C.A)
1) माळी मनोज विकासभाई -(B.C.A) Med-Eng- 78.00%
Diploma in Pharmacy (D.Pharma)
1) चव्हाण प्रशांत पुंडलिक -(D.Pharma) Med-Eng- 71.55%
Diploma in Chemical Engineering
1) महाजन संदीप विनोद (Chemical Engineering) Med-Guj – CGPA -7.29%
इत्यादी(२१)गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान व अभिनंदन समाजाकडून ट्रॉफी, प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवर व समाजातील दाताश्री यांच्या हस्ते करण्यात आला. व त्यांना पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी संपूर्ण समाजातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.श्री.काकासो. निळकंठ देवचंद महाजन व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग या स्पर्धा परीक्षेत उत्तम यश संपादन केलेले मा.श्री.आनंदराव आत्माराम माळी यांना श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, सुरत व संपूर्ण माळी समाज बांधवांच्या वतीने “माळी समाज भूषण पुरस्कार” शाल, श्रीफळ, ट्रॉफी,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अन्नदान कार्यक्रमासाठी सर्वोच्च देणगी देणारे दाताश्री.उमेशभाई चंद्रभाई हलवाई ५०००/- रूपये व दाताश्री.विनोद सोमा महाजन ३,१११/- रूपये यांचे आभार व सत्कार मंडळातर्फे करण्यात आले. त्याचप्रमाणे समाजातील सर्व दाताश्री समाज बांधवांचे देखील आभार मंडळातर्फे मानण्यात आले. तसेच विद्यार्थी मनोगतात कु.प्रणाली राजेंद्र महाजन या विद्यार्थिनीने पुढे उच्च शिक्षण घेऊन सी. ए. होण्याची इच्छा व्यक्त केली. व समाजाने आई वडिलांन सोबत माझा सत्कार व अभिनंदन(गुणगौरव) केले या बद्धल ऋण व्यक्त केले. श्री. भिकन दगा महाजन यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. व प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. निळकंठ देवचंद महाजन यांनी आपल्या मनोगतातून समाजाला वैचारिक व सामाजिक प्रबोधन केले व मंडळातर्फे “माळी समाज भूषण पुरस्कार” दिल्याबद्दल संपूर्ण समाज बांधवांचे देखील विशेष आभार मानले. शेवटी समाजाचे अध्यक्ष श्री. रमेश गंभीर महाजन यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित व सहभागी सर्व समाज बांधवांचे देखील विशेष आभार आपल्या मनोगतातून मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जागृती गुणवंत महाजन व श्री.प्रा.विलास देवाजी माळी, सर यांनी केले. त्याच प्रमाणे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाची भूमिका बजावणारे सर्व समाज बांधव, कार्यक्रमाचे आयोजक, कार्यकारी मंडळाचे प्रतिनिधी श्री.रमेश गंभीर महाजन श्री.भिकन दगा महाजन श्री.किशोर रामा महाजन श्री.एकनाथ दगा महाजन श्री.अशोक तानाजी महाजन श्री.विठ्ठल तापीराम महाजन श्री.भिमराव दौलत महाजन श्री.आत्माराम पौलाद महाजन श्री.संतोष खंडू महाजन श्री.विजय तुकाराम महाजन श्री. प्रविण रामचंद्र महाजन गुणगौरव समिती उपप्रमुख श्री.पुंडलिक मोतीलाल महाजन श्री. संतोष सजन महाजन श्री.वासुदेव खंडू महाजन श्री.नामदेव मोतीलाल महाजन श्री.ज्ञानेश्वर शांताराम महाजन तसेच सर्व महिला कार्यकारी मंडळाच्या प्रतिनिधी, सर्व महिला सांस्कृतिक मंडळाच्या प्रतिनिधी सौ.योगिता संजय महाजन, सौ.चंद्रकलाबाई विकास महाजन सौ.जागृती गुणवंत महाजन व समाज बांधव श्री.नरेंद्र पुंडलिक महाजन, सर श्री.दिपक चंद्रभान महाजन, सर,श्री.भरत दिनकर महाजन, सर,श्री.राम किरण राणे,सर श्री. गणेश एस महाजन, श्री.संजय तुकाराम महाजन श्री.अतुल गोकुळ महाजन श्री.सोनू काशिनाथ महाजन श्री.विनोद सोमा महाजन व नवयुवक मंडळाचे सर्व प्रतिनिधी व युवक मित्र परिवार तसेच अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व दाताश्री यांचे कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे सहकार्य लाभले तसेच सर्व समाज कार्यकर्ते बंधू-भगिनीं व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सौ.चंद्रकलाबाई विकास महाजन यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून मानले व कार्यक्रमाचा समारोप केला.

