दलित साहित्याची चौकट ओलांडून पुष्पा साळवे यांची कविता सृजनशील वाट निर्माण करते
![]()
दलित साहित्याची चौकट ओलांडून पुष्पा साळवे यांची कविता सृजनशील वाट निर्माण करते
पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या व्यथा ‘ कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

‘ दलित साहित्याची चौकट ओलांडून पुष्पा साळवेंची कविता सृजनशील वाट निर्माण करते ‘ असे गौरवोद्गार माजी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.कवयित्री पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या व्यथा ‘ कविता संग्रहाचे प्रकाशन अल्ब बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जळगाव येथे रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे असून प्रमुख अतिथी सर्वश्री आमदार राजू मामा भोळे ( जळगाव ),महापौर जयश्रीताई महाजन ( जळगाव महानगरपालिका ), उपमहापौर कुलभूषण पाटील,ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ,कवयित्री पुष्पा साळवे,डॉ.मिलिंद बागुल ( जिल्हाध्यक्ष, सत्यशोधक साहित्य परिषद ),प्रकाशक युवराज माळी अथर्व प्रकाशन मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढील प्रकाशनपर मार्गदर्शनात डॉ.सबनीस म्हणाले की जाती बाहेर जाऊन मापदंड स्वीकारणारी बाई आईच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारी दुःख मुक्त मानवतेचा ध्यास घेणारी तसेचदुःखाची कक्षा ओलांडून सामाजिक दुःखाचा विचार मांडणारी सक्षम कविता पुष्पा सावळे यांची आहे.सावित्री माई फुले यांचे समर्पण आणि रमाईचा त्याग साळवेंनी कवितेत मांडला.दलीत चळवळ थांबल्याचा अनुभव येतो आहे ही खंत व्यक्त करून साहित्यिकाला दुःखमुक्त मानवतेचा ध्यास असला पाहिजे.’असे आवाहन केले.
कवयित्री पुष्पा साळवे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, स्रीयांचे दुःख आणि वेदना आजही समाजाने पिचलेल्या आणि दाबलेल्या आहेत समाज वास्तव लक्षात घेता स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलविण्याची गरज असून स्त्रियांनी पुढे येऊन आपल्या दुःखाची मांडणी लेखणीच्या माध्यमातून करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी मत मांडले.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले दीप प्रज्ज्वलन महापौर जयश्री महाजन,डॉ.सबनीस यांचेसह मान्यवरांनी केले.आमदार राजू मामा भोळे मार्गदर्शनात म्हणाले की,’ पुष्पा साळवे यांची कविता कष्टकरी व बळीराजाचे दुःख,पिडीत स्त्रियांच्या वेदना व सीमारेषेवरील सैनिकांच्या व्यथा मांडणारी सर्वसमावेशक कविता आहे.’ जनसेवेत त्याग आणि समर्पणाची उणीव असल्याची खंतही भोळेंनी व्यक्त केली.’ उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी कविता समाजप्रबोधनपर व मूल्यशिक्षण देणारी असल्याचे स्पष्ट केले.महापौर जयश्री महाजन मार्गदर्शनात म्हणाल्या की,’ पिडीतांच्या वेदना शब्दात टिपणाही संवेदना ही ताईंना मिळालेली काव्यनिर्मितीची शिदोरी आहे.प्रचंड प्रतिसाद हा ताईंच्या कर्तृत्वाची व संस्कारांची साक्ष आहे.’ जयसिंग वाघ म्हणाले की,’ क्रांतीची मशाल हाती असली तरी परिवर्तनाची मानसिकता नसलेली क्रांती क्षणिक असते.दीनदलित व आदिवासिंच्या व्यथांना निर्भयपणे साहित्यिकांनी वाचा फोडली पाहीजे. बुद्धीवादयांची तटस्थता व राजकारण्यांची लंवेदनशून्यता यामुळे अत्याचाराची बीजे फोकावतात.समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात मुकुंदभाऊ सपकाळे म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि समाज व्यवस्था ही रूढी परंपरावादी असून अशा समाज व्यवस्थेने आजपर्यंतचा इतिहास पाहता स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेले आहे सुशिक्षित सुजाण श्रिया देखील या रुढीपरंपरावादी व्यवस्थेला बळी पडलेले आहेत आणि यामुळेच मणिपूर सारख्या घटना राज्यकर्त्यांच्या सत्ताधीशांच्या मदतीने घडून येत आहेत यासाठी स्त्रियांनी आपल्या व्यथा, वेदना मांडत समाज व्यवस्थेतील प्रस्थापितांना जाब विचारण्याची खरी वेळ आज आली असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले.
कार्यक्रमास कुमूद प्रकाशनाच्या संचालिका संगिता माळी,मंगल पाटील,ज्येष्ठ कवयित्री विमल वाणी,अभियंता प्रमोद माळी,गोविंद देवरे,प्रफुल्ल पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी,आप्तेष्ट बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ मिलिंद बागुल यांनी केले.याप्रसंगी शशिकांत साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्र संचलन प्रा.डॉ.प्रदिप सुरवाडकर व आभार प्रदर्शन विजय लुल्हे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधकी साहित्य परिषद जिल्हा शाखेचे सदस्य तसेच शशिकांत साळवे,शामकांत साळवे,मिलिंद साळवे,रवींद्र बाविस्कर,दिनेश जाधव तसेच आप्तेष्ट व मित्रपरिवाराने केले .
फोटो
पुष्पा साळवे लिखित मनाच्या व्यथा कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, मुकुंद सपकाळे, डॉ. मिलिंद बागुल, युवराज माळी, जयसिंग वाघ, उपमहापौर कुलभूषण पाटील, शशिकांत साळवे नरेश चौधरी व अन्य मान्यवर.

