भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत पालक सभेला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद
![]()
आज भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत पालक सभेला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी-आज 19/7/2023 रोजी भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत पालक सभा आयोजीत करण्यात आली. पालक सभेचे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे यांनी स्वीकारले. पालक सभेचा मुख्य हेतू हाच असतो की, प्राथमिक शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या इमारतीचा पाया नेमक्या याच काळात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक व पालकांचा एकत्र संवाद साधला तर त्या विद्यार्थ्यातील हिऱ्याला चांगल्या प्रकारे पैलू पाडता येऊ शकतात. म्हणूनच या सभेत माता पालक संघ व पालक संघ यांची स्थापना करण्यात आली. पालक सभेत पालकांच्या असलेल्या अडचणी शंका सोडवण्यात आल्या. आजच्या काळात विद्यार्थ्यांना मेडिटेशन ची फार आवश्यकता आहे. सौ विजया गायकवाड बाई यांनी मोबाईलचे दुष्परिणाम सांगुन. विद्यार्थी व पालक यांचा सूसंवाद होणे किती आवश्यक आहे हे सांगण्यात आले. अध्यक्ष सौ मंगला सोनवणे यांनी आजच्या काळात मुलांना संस्काराची खूप गरज आहे. मुलांवर संस्कार कशा पद्धतीने करू शकतो हे गोष्टीनूरूप सांगितले. पालक सभेत सर्व शिक्षकांनी पालकांच्या समस्या हितगुज करून सोडवल्या. पालक सभेचे औचित्य साधून सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुकन्या योजनेची माहिती सांगितली.सौ सविता देशमुख यांनी पालक सभेचे सूत्रसंचालन केले. पालक सभेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या. पालकांनी चहापानाचाही आस्वाद घेतला. वंदे मातरम ने पालक सभेची सांगता करण्यात आली.



