मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय मिळावा
लोक संघर्ष मोर्चाचे अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
![]()

मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय मिळावा
लोक संघर्ष मोर्चाचे अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी- भारत मातेचा महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म आपण एक महिला असून आपल्या देशामध्ये आजपर्यंत कधी न घडलेला कधी न पाहिलेला महिलांवरील एवढा मोठा अत्याचार संपूर्ण भारतासह जगभरात विविध वृत्तवाहिन्या व सोशल मीडिया द्वारे सर्व महिला पुरुष पाहत असून आपल्या कार्यक्रम काळात अशा घटना घडत असतील तर भारत मातेचे आमच्या आया बहिणींसाठी खूप मोठे दुर्दैव समजावे लागेल.
सदरची घटना घडुन दोन अडीच महिने उलटून मणिपूर मध्ये हिंसाचार अत्याचार येथील राज्य सरकार व केंद्र सरकार सह जगभर नाव मोठं करणारे पंतप्रधान मोदी मणिपूर येथे जाऊन शांततेचे आवाहन करू शकले नाही हे भाजप सरकारचे अपयश आहे. जे शासन आपल्या देशातील आपल्या राज्यातील महिलांचे संरक्षण करू शकत नाही अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
आम्ही आपणास विनंती करतो की मणिपूर येथील घडलेल्या घटनेतील दोषी अटक करून फाशी द्या, मणिपूर येथील कुकी समाज आदिवासी असून त्यांच्या समाजावर गदा आणण्यासाठी त्यांना आपल्या गावातून व प्रदेशातून बेदखल करण्याचे जे षडयंत्र राज्य सरकारच्या व प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे.हे तात्काळ थांबून कूकी समाजातील सर्व लोकांना पुरेशे संरक्षण देत त्यांना पुन्हा आपल्या गावी प्रस्थापित करून त्या सर्व आरोपीवर अनुसूचित जातीत जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांसह दंगली व मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करावे .पोलीस प्रशासनातील ज्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील त्यांना तात्काळ बडतर्फ करावे. मणिपूर सरकार राज्य चालवण्यासाठी निष्क्रिय ठरले असून मणिपूर मधील कुकी समाजावरील अत्याचार थांबले नाहीत तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे, संदीप घोरपडे, शेख रियाजुद्दीन, राजू शेख, रणजीत पाटील,फिरोज शेख,शेख अन्वर,शेख तय्यब,अहमद पठाण, राजु शेख,अविनाश पवार, अनिल पारधी, मुक्तार खाटीक, किरण सोनवणे, गणेश चव्हाण, अहमद अली दस्तगीर ,दबीर पठाण, आशिष बागवान यांच्यासह अनेक संघटनेचे कार्यकर्ते यांनी दिले.

