1 min read

डॉ मयुरी विक्रांत पाटील वैद्यकीय क्षेत्रात भरारी…

Loading

डॉ मयुरी विक्रांत पाटील वैद्यकीय क्षेत्रात भरारी…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिद्द ,चिकाटी व मेहनत असली की आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरते.. आपल्या परीवारातील सदस्याच्या पावलावर पाऊल ठेवत डॉक्टर मयुरी विक्रांत पाटील हिने वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवत स्त्री रोग तज्ञ म्हणून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. अमळनेर तालुक्यात शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सविस्तर माहिती अशी कि डॉ मयुरी विक्रांत पाटील, ह्या पदव्युत्तर शिक्षण MBBS, MS Obstetrics and Gynaecology (स्रिरोग तज्ज्ञ) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांनी एमबीबीएस चे शिक्षण ‘काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे’ येथून पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण हे ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे मेडिकल कॉलेज, अहमदनगर’ येथून पूर्ण केले. डॉ. मयुरी ह्या अमळनेर येथील पद्मश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. विक्रांत पाटील यांच्या पत्नी आणि स्वर्गीय डॉ. पी एन(के) पाटील व श्रीमती प्राजक्ता पी पाटील यांच्या स्नुषा होत. येणाऱ्या काळात त्यांना लेप्रोस्कोपी ह्या विषयात फेलोशिप करण्याचा त्यांचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *