1 min read

शहरातील वरखेडी रोड येथे कचरा डेपो व मनपा मालकीचा गांडूळ खत प्रकल्पाच्या कामाची पाहणी

Loading

शहरातील वरखेडी रोड येथे कचरा डेपो व मनपा मालकीचा गांडूळ खत प्रकल्पाच्या कामाची पाहणी महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांनी दिनांक 20/07/2023 रोजी पाहणी केली. याप्रसंगी आयुक्त श्री.देविदास टेकाळे, माजी उपमहापौर सौ.कल्याणीताई अंपळकर यांची प्रमुख उपस्थित होती.
मनपा मालकीच्या कचरा डेपोवरील वस्तूस्थिती व परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीकोनातून सदर पाहणीचे आयोजन करण्यात आलेले होते. याठिकाणी असलेल्या कचरा टाकण्यासाठी उपलब्ध जागा, कचऱ्यावर होणारी प्रक्रिया याबाबत माहिती घेवून यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी संबंधितांना दिले. कच:याची विल्हेवाट योग्यप्रकारे करण्यासाठी नियोजन व त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे ही आदेशित करण्यात आले.
या पाहणी प्रसंगी अति.आयुक्त श्री.विजय सनेर, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री.राजेश वसावे श्री.चंद्रकांत जाधव स्वच्छता निरीक्षक श्री.विकास साळवे गांडूळ खत प्रमुख रविंद्र जाधव हे सर्व उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *