नवीन शैक्षणिक धोरण 2020
शिक्षण पद्धतीतील बदल, NEP 2020 धोरणाची तत्वे..व संधी…
![]()

नवीन शैक्षणिक धोरण 2020
शिक्षण पद्धतीतील बदल, NEP 2020 धोरणाची तत्वे..व संधी…
नवीन शैक्षणिक धोरणानुसार येणाऱ्या काळात ज्ञानाच्या बाबतीत वेगाने बदल होत आहे बिग डेटा, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता ,यासारख्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे जगभरातील व अकुशल कामे यंत्रे करू शकतील.
विशेषता गणित ,संगणक विज्ञान आणि डेटा सायन्स यातील कुशल कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काळात प्रचंड मागणी असेल.
भारत हे राष्ट्र जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक होत असताना मानव्य शास्त्र आणि कलेची मागणी वाढत जाईल त्यामुळे याही क्षेत्रात अनेक संधी भारतीय तरुणांना असणार आहे गरज आहे ती या सर्व विषयांमध्ये तज्ञ होण्याची
2040 पर्यंत कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेपेक्षा दुय्यम नसलेली शिक्षण व्यवस्था असणे हे भारताचे ध्येय असेल.
अनेक संधीची निर्मिती जागतिक स्तरावर येणाऱ्या काळात मिळणार असून भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ती कोणते विषय महत्त्वाचे आहेत या सर्व गोष्टीचा अभ्यास करून त्या पद्धतीचे शिक्षण आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट केले आहे त्यामुळे रोजगाराची अनेक संधी भारतीय तरुणांना असणार आहे.
NEP 2020 धोरणाची तत्वे:
विद्यार्थ्यांची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता ओळखणे व या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्त्वाचे ध्येय नेप 2020 चे असेल.
लवचिकता म्हणजेच प्रतिभा व आवड यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल.
विविध शाखेतील अंतर कमी करणे बहुशाकीय आणि समग्र शिक्षण देणे हे महत्त्वाचं धोरण असणार आहे.
घोकंपट्टी ऐवजी संकल्पना समजण्यावर भर देणे या पुढील काळात असणार आहे.
नैतिक मूल्य जपणूक तसेच अध्ययन अध्यापन प्रक्रियेत बहुभाषिकत्त्व प्रोत्साहन असणार आहे.
कोचिंग संस्कृतीपेक्षा सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर म्हणजेच वर्षाच्या शेवटी परीक्षा न घेता मासिक व त्रिमासिक परीक्षेवरती भर..
तंत्रज्ञानाचा वापर, विविधता व स्थानिक महत्त्व
सर्व पातळीवरील शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता, उत्कृष्ट दर्जाचे संशोधन.
देणगीदार ,खाजगी व सामुदायिक संस्थांच्या भागीदारीला प्रोत्साहन…
विद्यार्थ्याच्या मूल्यमापनातील प्रक्रियेत परिवर्तन
विद्यार्थी विकासासाठी पालक शिक्षक बैठकीचं आयोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी येत्या काळात असेल.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शैक्षणिक पद्धतीमध्ये असणार आहे.
दहावी व बारावी बोर्ड परीक्षा तंत्रात बदल घडवून येणार आहे जेणेकरून कोचिंग क्लास लावण्याची आवश्यकता भासणार नाही अशी व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणात केलेली आहे.
बोर्ड परीक्षा आणखी सोप्या केल्या जातील व वर्षातून दोनदा परीक्षा देण्याची सोय असेल एक मुख्य तर दुसरी सुधारणा परीक्षा असेल
फक्त दहावी बारावीच्या शेवटीच नाही तर तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना योग्य प्राधिकरणामार्फत परीक्षा द्यावी लागेल.
ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट तर्फे PARAKH म्हणजेच, (परफॉर्मन्स असेसमेंट अनालिसिस ऑफ नॉलेज फोर होलेस्टिक डेव्हलपमेंट) याही बाबींचा समावेश असणार आहे तसेच इंटरनेट स्मार्टफोन टॅबलेट द्वारे शिक्षण विद्यार्थ्यांना येता काळात मिळणार असेल या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अमुलाग्र असे बदल आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून आपल्या देशात सुद्धा या पद्धतीचे शैक्षणिक धोरण राबवण्याचे प्रयत्न हे त्या वर्षात होणार असून आपल्या नवीन पिढीला जरी हे नवीन असेल तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संधी प्राप्त करण्याच्या दृष्टीने भारताचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे आपण मनापासून स्वागत करूया व एक नवीन भारताची मुहूर्तमेढ रचण्यासाठी आपण तत्पर असुया…
कल्याण नरसिंगराव सोळुंके(M.Sc.M.Phil.B.Ed.)
विज्ञान शिक्षक
मत्स्योदरी विद्यालय अंबड.

