अमळनेर पोलीस स्टेशनचे निंबा शिंदे पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती…
![]()

अमळनेर पोलीस स्टेशनचे निंबा शिंदे पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निंबा देवराम शिंदे यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती त्यांना मिळाली आहे. त्यांनी आजतागायत अनेक गुन्ह्यांचा यशस्वी शोध लावला आहे
सविस्तर माहिती अशी की निंबा शिंदे यांनी बस स्थानकावर नागरिक व महिलांची सोने ,पैसे हरवले असतात. अशावेळी अशा व्यक्ती शिंदे यांच्या जवळ जाऊन आपली कहाणी सांगतात एक पोलिसातला माणूस त्याचा शोध लावत त्यांचे गेलेले पैसे सोने त्यांना परत मिळून देतो.. अत्यंत साधी राहणी, मितभाषी व्यक्तीमत्व असलेले निंबा शिंदे यांना अमळनेर शहरांमध्ये लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण ओळखतात. त्यांना पदोन्नती मिळाल्यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनचे डिवाएसपी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अभिनंदन केले आहे..
सांज दैनिक अमळनेर प्रतिनिधी ईश्वर महाजन यांनी त्यांचे अभिनंदन करत सत्कार केला..

