1 min read

भादलीच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

Loading

भादलीच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

( शिष्यवृत्ती परीक्षेत आठवीचे 27 मुले व पाचवी चे नऊ मुले गुणवत्ता यादीत) महात्मा गांधी विद्यालयाच्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले त्यानिमित्त विद्यालयात इयत्ता आठवीचे 27 व इयत्ता पाचवी चे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यामुळे त्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोविंद दादा महाजन चेअरमन रुरल एज्युकेशन सोसायटी भादली बुद्रुक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री डी एम पाटील अधिव्याख्याता शासकीय तंत्रनिकेतन जळगाव हे होते प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी सातत्य ठेवून यश संपादन करावे असे सांगितले सदर प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी सुनील भाऊ नारखेडे जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र कोल्हे संचालक मधुकर झांबरे श्री सुनील अत्तरदे श्री यशवंत खाचणे श्री सुधाकर नारखेडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी के धनगर सर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ प्रज्ञा नारखेडे यांनी केले आभार श्रीमती शुभांगी पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमास पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *