अमळनेर येथे विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा संपन्न
![]()
अमळनेर येथे विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा संपन्न
अमळनेर(वार्ताहर)- काल सोमवार दिनांक 17 जुलै रोजी अमळनेर तालुक्यातीलमाध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांची एक दिवसीय कार्यशाळा साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथे आयोजित करण्यात आली होती .सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती अमळनेर चे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील होते. सोबतच संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील ,विलास पाटील, अनिल चौधरी, एन. वाय. साळुंखे, विकास पाटील, संजीव पाटील, एस. व्ही. पाटीलयांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुका विज्ञान समन्वयक निरंजन पेंढारे ,सह समन्वयक डी. के. पाटील विज्ञान शिक्षिका प्रमिला अडकमोल ,दीपक महाजन यांनी प्रमुख विषयांवर मार्गदर्शन केले .सदर कार्यशाळेत सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षात करावयाचे विविध वैज्ञानिक उपक्रम इन्स्पायर अवार्ड रजिस्ट्रेशन ,आयडिया बॉक्स स्पर्धा,राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद ,विज्ञान नाट्य उत्सव, विद्यार्थी विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शन इत्यादी उपक्रमांसंदर्भात उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रसंगी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या चांद्रयान 3 यशस्वी प्रक्षेपण च्या गगनभरारी कामगिरीचे अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .तसेच रॉकेट मॉडेलिंग कार्यशाळा, इस्रोचे पोस्टर प्रदर्शन ,विविध शालेय स्पर्धा परीक्षा, एन. एम. एम. एस.परीक्षा या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले .शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विज्ञान शिक्षक हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो ,सर्व उपस्थित शिक्षकांनी अमळनेर तालुक्यातून इन्स्पायर अवार्ड साठी जास्तीत जास्त नॉमिनेशन करून जिल्हाभरात अव्वल कामगिरी करून दाखवावी अशी अपेक्षा गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केली.ह्याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनात गेल्यावर्षी राज्यस्तरापर्यंत पोहोचलेल्या साने गुरुजी विद्यालयाचा विद्यार्थी साईराज रोजेकर याचाही सत्कार करण्यात आला. सोबतच मारवड येथील नवनियुक्त मुख्याध्यापक एन.वाय .साळुंखे, केंद्रप्रमुख किरण सिसोदे ,पी. एच. डी. पदवी प्राप्त शिक्षिका भाग्यश्री वानखेडे यांचाही सत्कार करण्यात आला .याप्रसंगी अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाची सन 2023-24 साठी नवनियुक्त कार्यकारिणी घोषित करण्यात आली .सदर कार्यशाळेसाठी रत्ना गुजर मॅडम, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव साहेब ,जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे ,कार्याध्यक्ष बी. आर. महाजन,उपाध्यक्ष संदीप पाटील ,सचिव सुनील वानखेडे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी तर आभार प्रदर्शन जगदीश पाटील यांनी केले.



