ॲड ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूलच्या सुसज्ज आणि उच्च श्रेणी तंत्रज्ञानाच्या डिजिटल संगणक लॅबचे उद्घाटन
![]()


ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूलच्या सुसज्ज आणि उच्च श्रेणी तंत्रज्ञानाच्या डिजिटल संगणक लॅबचे उद्घाटन
अमळनेर प्रतिनिधी(: ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूलच्या सुसज्ज आणि उच्च श्रेणी तंत्रज्ञानाच्या डिजिटल संगणक लॅबचे उद्घाटन आज संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटिल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पूर्वी पेक्षा मोठ्या क्षमतेची डिजिटल संगणक लॅबची निर्मिती करत विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणात मदत व्हावी यासाठी संस्थेने नवीन संगणक प्रणाली व डिजिटल लॅबचे नूतनीकरण केले. याप्रसंगी सचिव प्रा.श्याम पाटिल, संचालक पराग पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, प्रा पी. बी. महाजन, प्रा आशिष शर्मा, उपप्राचार्या अश्विनी चौधरी, हेडमिस्ट्रेस मंगला चौधरी, संगणक विभागाचे शिक्षक जितेंद्र वाणी, अतुल भदाणे आदी उपस्थित होते.

