5 गरजू,होतकरू व गरीब
विद्यार्थ्यांना-अमळनेर क्लासेस
संघटनेने(PTA) ने घेतले दत्तक….
![]()

5 गरजू,होतकरू व गरीब
विद्यार्थ्यांना-अमळनेर क्लासेस
संघटनेने(PTA) ने घेतले दत्तक….
अमळनेर प्रतिनिधी
आपण समाजाचे देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून सामाजिक ऋण फेडण्याचे काम अमळनेर शहरातील मितभाषी व साई इंग्लिश क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर व त्यांची संघटनेचे पिटीए चे पदाधिकारी हे नेहमीच कटिबद्ध असते…
सविस्तर माहिती अशी कि शुक्रवार दि.14 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेर
तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील
5 गरजू, होतकरू व गरीब
विद्यार्थ्यांची अमळनेर क्लासेस
संघटनेने(PTA)उचलली शैक्षणिक
जबाबदारी.सदरील 5 विद्यार्थ्यांपैकी
4 विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे.
सर्वच विद्यार्थी अमळनेर येथील
महाविद्यालय,विद्यालय येथे शिक्षण
घेतात.मनिष पाटील,अमळनेर
(इ.11वी), अनिता पावरा, मंगरूळ
(इ.10वी), मेहुल विसपुते,तांबेपुरा
(इ.9वी), गौरव चौहान,पिळोदे(इ.7वी),
कल्याणी भोई,पैलाड(इ.7वी).
सदरील विद्यार्थ्यांना एका वर्षभरासाठी
फ्री कोचिंग देण्यात येईल- सदरील
विद्यार्थ्यांकडून क्लास फी चे कोणतेही
शुल्क घेतले जाणार नाही व वर्षभर
सर्वांना शैक्षणिक साहित्य देण्यात
येईल-अशी अधिकृत घोषणा
मा.महादेव खेडकर साहेब-
उपविभागीय अधिकारी व
उपविभागीय दंडाधिकारी
अमळनेर भाग,अमळनेर.यांच्या
कार्यालयात क्लासेस संघटना(PTA)
अध्यक्ष-श्री.भैय्यासाहेब मगर सर
यांनी केली.यावेळी मा.महादेव
खेडकर साहेब यांच्या हस्ते सदरील
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात
आले.यावेळी क्लासेस संघटना(PTA)
अध्यक्ष-श्री.भैय्यासाहेब मगर सर,
श्री.संजय पाटील सर,श्री.महेश बढे
सर, आयकेडी अँकडमीचे संचालक किरण माळी सर, सौ.सोनल
जोशी मॅडम, श्री.परेश गुरव सर
उपस्थित होते.

