ब्राम्हणशेवगे येथे साकारणार कडूलिंबाचे वन
![]()


ब्राम्हणशेवगे येथे साकारणार कडूलिंबाचे वन..
चाळीसगाव /प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांचे प्रयत्नातून व ग्रामपंचायत व सामाजिक संस्था यांचे मदतीने मोठ्या प्रमाणात झाडे लावली जात आहेत. निसर्गटेकडी परिसरात ही सामाजिक वनिकरण विभाग सेवा सहयोग फाऊंडेशन, व वेंडर लॅन्ड कंपनी व लोकसहभागातून जवळपास पंचवीस हजार झाडांचे संगोपन व जतन करण्यात येत आहे. ओसाड व पडीक जागेवर कडुलिंब वन साकारण्यात येत असून या ठिकाणी जवळपास दोन एकर क्षेत्रामध्ये पाचशे कडुलिंबाची झाडं लावण्यात येत आहेत यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या मदतीने वृक्षारोपण होत आहे.या क्षेत्रामध्ये मागील वर्षीही जवळपास दोन हजार झाड लावून जगवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या परिसरातील जमिन पुर्णपणे मुरमाड असल्याने उन्हाळ्यात ही झाडे जगवण्यासाठी खुप कसरत करावी लागली होती. परंतु ती आता पाऊस सुरु झाल्याने मस्त वाढण्यास मदत होत आहे. या क्षेत्रात चालू वर्षी कडूलिंब वन साकारण्याचा संकल्प सोमनाथ माळी यांनी केला असून आज रोजी कडुलिंबाचे झाडे लावण्यास सुरवात झाली आहे.

