अखेर रिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषद
आरोग्य कर्मचऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण.
![]()

अखेर रिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषद
आरोग्य कर्मचऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण.
बऱ्याच वर्षांनी रिक्त असलेल्या पदावर कायमस्वरूपी जिल्हा परिषद आरोग्य सेवा विभागाला अखेरीस जिल्हा आरोग्य अधिकारी भेटले.
आज दिनांक-१४ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये नव्याने रुजू झालेले, जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ सचिन भायेकर साहेब यांचे स्वागत व अभिनंदन हे..
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
तसेच नुकतेच माजी प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी… म.रा.जी.प.आरोग्य कर्मचारी सेवा कर्मचारी संघटना २५७/८९ चे जिल्हा अध्यक्ष-विजय देशमुख, सरचिटणीस-ज्ञानेश्वर पाटील, कार्याध्यक्ष-राजेश कुमावत, उपाध्यक्ष-जयंत पाटील, नितीन जगताप, राज्यसंघटक-सुनील ढाके, जेष्ठ मार्गदर्शक-प्रकाश कोळी प्रसंगी.. आदी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी वर्गाचे कोणत्याही प्रकारच्या अडी-अडचणी येत असल्या किंवा कोणतेही प्रश्न उदभवल्यास सोडवण्यास मी तयार असून सर्व केडरचे मासिक होणारे वेतन असो किंवा प्रमोशन, कालबध्द, शिकाऊ, काळ आदी सर्व प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे प्रतिपादन हे नुतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी उपस्थित संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पदाधिकारी यांना अश्वासीत केले.
शेवटी कर्मचारी वर्गाचे काम मार्गी लावण्याचे अस्वस्थ केल्या बद्दल संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष-विजय देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आभार मानले.

