1 min read

सेवा निवृत्त शिक्षकांना ₹ २०,०००/- मानधनावर नियुक्ती म्हणजे D Ed, B Ed, TET, TAIT उमेदवारांवर प्रचंड अन्याय,या तरूण मुलांच्या आयुष्याचं गणित सुटण्याऐवजी अधिक कठीण होईल

Loading

सेवा निवृत्त शिक्षकांना ₹ २०,०००/- मानधनावर नियुक्ती म्हणजे D Ed, B Ed, TET, TAIT उमेदवारांवर प्रचंड अन्याय

या तरूण मुलांच्या आयुष्याचं गणित सुटण्याऐवजी अधिक कठीण होईल

हेच मानधन या तरुण पिढीला देवून त्यांची नेमणूक रीतसर शिक्षक सेवक करा -श्री आत्माराम मेस्त्री

सर्वच संघटनांनी याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे, असं मला वाटत. सेवा निवृत्त शिक्षक बंधु-भगिनीनी खरंतर ठाम भूमिका घ्यायला हवी.सर्व सेवानिवृत्त झालेल्या बंधू-भगिनींना नम्र विनंती की, याबाबत आपण राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणीही अर्ज करू नये.बेरोजगार विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य करावे. हजारो विद्यार्थी D.Ed, B.Ed होऊन बेरोजगार आहेत.सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी आपल्या नोकरीत असताना यापूर्वी एक लाखापर्यंत पगार घेतलाआहे. आता आपणांस जास्तीत जास्त सरासरी 40/45 हजार पेन्शन सुरू आहे .आणि आता यापदावर शासनाच्या अटी शर्थी मान्य करून फक्त 20,000 रुपये मानधन घेणार आहात.व बेरोजगार लोकांच्या जागा अडकवून बसणार आहात. त्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. शासन त्वरित भरती करणार नाही.कारण त्यांचे या मानधनी शिक्षक नियुक्ती मुळे प्रशासकीय काम भागत जाईल व भरती करण्यासाठी दुर्लक्ष केले जाईल.हा बेरोजगार D.ED, B.ED.झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.शासनाने भरती करायलाच पाहिजे.त्यामुळे कोणत्याही सेवानिवृत्त शिक्षकांनी कृपया हे मानधनी पद स्वीकारू नये.जर आपल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी हे तात्पुरते मानधनी पद स्वीकारले.तर शिक्षक भरतीच होणार नाही.व आपल्याच भावी पिढीतील,सहकारी बांधवांचे अतोनात नुकसान होईल.यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी याचा विचार करून यांस विरोध म्हणून कोणीही अर्ज करू नये.असे माझे वैयक्तिक मत आहे. संघटनेने सुद्धा याचा विचार करून पुढाकार घेऊन सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये ही जागृती करावी अशी आमची धारणा आहे. असे स्पष्ट मत श्री मेस्त्री सर यांनी व्यक्त केले आहे.
सबंध राज्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *