वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड.
पांडुरंग विद्यालयाचे विद्यार्त्यांना राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील :: डॉ.पद्मावती पाटील.
![]()




वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड.
पांडुरंग विद्यालयाचे विद्यार्त्यांना राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील :: डॉ.पद्मावती पाटील.
मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी )नुकताच प्लॅन इंडिया या इंटरनॅशनल संस्थेमार्फत आयोजित CHILDREN’S CREATIVITY FESTIVAL डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी पांडुरंग विद्यालय मुलुंड मुंबई या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली देशातील बारा राज्यातील विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आपापल्या राज्याच्या संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांनी विविध कलांगुणानमधून दाखवून दिली. प्लॅन इंडियाच्या SAFE GUARDING POLICY अंतर्गत स्त्री पुरुष समानता ,बालविवाह, लैंगिक शोषण, दर्जेदार शिक्षण या विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली ,या उपक्रमासाठी शाळेतील कुमारी खुशबू भुरटे ,कुमारी गार्गी मेस्त्री, कुमार खुशाल गायकवाड, कुमार नागेश यादव या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शिक्षक श्री केशव मालुंजकर हेही विद्यार्थ्यांबरोबर उपक्रमात सहभागी झाले होते. कोळी नृत्य ,पोवाडा, पथनाट्य या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित उत्तराखंड राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री माननीय श्रीमती अर्चना आचार्य यांचे स्वागत करण्याचा मान महाराष्ट्र टीमला मिळाला यामुळे विद्यार्थ्यांचा कर्तव्यपूर्तीचा आनंद द्विगुणीत झाला. या उपक्रमासाठी वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या संस्थापिका माननीय डॉक्टर पद्मावती पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन आणि कौतुक केले.तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना व शाळेला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

