ब्राम्हणशेवगे येथे श्रमदानातून स्मशानभूमी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण..
![]()


ब्राम्हणशेवगे येथे श्रमदानातून स्मशानभूमी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण..
चाळीसगाव /प्रतिनिधी
आपले गाव स्वच्छ असावे स्वप्नातील सुंदर गाव असावे यासाठी गावातील तरुणांनी ध्यास घेतला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. गावातूनही ग्रामपंचायतीतर्फे सोमनाथ माळी यांचे संकल्पनेतून व प्रयत्नातून तसेच आपल्या आप्तेष्ट, नातेवाईकांच्या स्मरणार्थ झाडे लावून जतन केली जात आहेत.सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपा पदाधिकारी रत्नाकर पाटील यांच्या पत्नी मनिषाताई पाटील यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाल्या नंतर लागलीच विकास कामांना जोमाने सुरवात केली आहे. गावातील नादुरुस्त गटारींची तसेच मुख्य चौकातील रस्याची साफसफाई, स्वच्छता करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून स्मशानभूमी स्वच्छता अभियान नुकतेच राबविण्यात आले. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.
याप्रसंगी गावातील माधवराव बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर पाटील, पोलीस पाटील राजेंद्र माळी,जल व पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी,शांताराम शिर्के,राजेंद्र बाविस्कर, योगेश चव्हाण, विलास देसले,विलास चव्हाण, रमेश निकम,पिना दाभाडे,पिना पाटील, समाधान चव्हाण सहभागी होते.

