1 min read

भडणे येथील रिक्षा चालकाचा मुलगा बनला बी एस एफ जवान

Loading

भडणे येथील रिक्षा चालकाचा मुलगा बनला बी एस एफ जवान ,,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील रिक्षा चालक प्रकाश विश्राम पाटील यांचा एकुलता एक मुलगा भारतीय सैन्यात बीएसएफ मध्ये अमोल पाटील यांची निवड झाल्याबद्दल भडणे ग्रामस्थांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता अमोल पाटील या मुलांनी आपले शालेय शिक्षण भडणे नवलनगर धुळे येथे पूर्ण करून एम एस सी पूर्ण करून देश सेवा करावी ही प्रगत इच्छा मनाशी बाळगून आर्मी नेव्ही बीएसएफ आधी भरतीमध्ये प्रयत्न करणे चालू ठेवले नियमित अभ्यास सकाळ संध्याकाळ व्यायाम स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करून तयारी करणे दोन वर्षापासून चालू होती नुकतीच गुजरात राज्यातील गांधीनगर येथे बीएसएफ ची भरती होती त्या भरतीत सीलेकशन होऊन त्याची बीएसएफ मध्ये निवड झाल्याने भडणे येथिल पहिला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये ओबीसी जागेतुन भरतीत आहे सध्या तरी एकच मुलगा गावातून भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे एका सामान्य कुटुंबातील रिक्षा चालकाचा मुलगा बीएसएफ मध्ये भरती झाल्याने गावकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला त्रिपुरा राज्यातील आगरतरा या ठिकाणी ट्रेनिंग साठी उद्या रवाना होणार आहे या बद्दल भडणे ग्रामस्थांतर्फे दिनांक आठ जुलै रोजी सतीश विश्राम वाघ यांचे निवासस्थानी सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भडणे येथील सरपंच गिरीश पाटील भडने येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी अमोल वाघ यांच्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक देवराम पाटील अशोक वाघ हिम्मत वाघ संजय पाटील विठोबा पाटील सतीश पाटील भैय्या पाटील अतुल पाटील ज्ञानेश्वर ठाकरे गुलाब वाघ डॉक्टर राहुल तडवी शिवराम पाटील अभिनव पाटील दादू पाटील संजय चौधरी आबा पाटील नाना पाटील कृष्णा पाटील बापू ठाकरे विजय वाघ संजय वाघ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज बागुल यांनी केले
चौकट,,,,,,,,,
अमोल वाघ बीएसएफ जवान
गावातील नव तरुणांना सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन तसेच त्यांच्याकडून सैन्य भरतीसाठी कसा अभ्यास व सराव करावा याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेण एकुलता एक असलो तरी देश सेवेसाठी सेवा करावी ही माझी बालपणापासून इच्छा होती आणि आज ति इच्छा भरती झाल्यामुळे पूर्ण झाल्याने मनाला समाधान वाटले,,,,,,,,,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *