शिक्षकांच्या विविध प्रश्नां साठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी घेतली राज्याचे शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी साहेब यांची भेट. विविध मागण्यासाठी दिले निवेदन
![]()

शिक्षकांच्या विविध प्रश्नां साठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी घेतली राज्याचे शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी साहेब यांची भेट. विविध मागण्यासाठी दिले निवेदन
काल दि 7, रोजी पुणे येथे शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी राज्याचे शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी साहेब यांची पुणे येथे जाऊन बालभारती कार्यालयात भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी मा संचालक यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने 20 टक्के 40 टक्के अनुदान पात्र शिक्षकांचे मागील तीन ते चार महिन्यापासून वेतन बंद आहे ते तात्काळ पूर्वत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर नव्याने वीस टक्के अनुदान मंजूर झालेल्या अनेक शिक्षकांचे राज्यातील विविध विभागात शालार्थ आयडी प्रलंबित आहेत त्यामुळे शिक्षकांना 20 टक्के पगार मंजूर होऊन देखील वेतन मिळत नाही. त्याबाबत तात्काळ कारवाई होऊन त्वरित प्रलंबित शालार्थ आयडी देण्यात यावे ही मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रलंबित मेडिकल बिल व सातव्या वेतन आयोगाचा फरक अद्यापही देण्यात आलेला नाही, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्रलंबित मेडिकल बिल व फरकाच्या रकमा मिळाल्या परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा वरील शिक्षकांना अद्यापही त्यांचे थकीत मेडिकल बिल व फरकाच्या रकमा मिळालेल्या नाहीत. यासाठी प्रामुख्याने लक्ष घालून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे देखील थकित मेडिकल बिल व फरकाच्या रकमा मिळाव्या अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले. तसेच प्रस्तावित वाढीव पदांची यादी लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. शुभांगी ताईंच्या या निवेदनावर तात्काळ कारवाई करत माननीय शिक्षण संचालक यांनी 20 टक्के व 40 टक्के अनुदान प्राप्त शिक्षकांचे थकीत वेतनाचे ह्या महिन्याचे पगार कालच्या काल टाकण्याचे आदेश दिले. तसेच मागील थकीत वेतनाचे देखील येत्या दोन ते तीन दिवसात वेतन टाकण्याची निर्देश माननीय संचालक सोया यांनी दिले. तसेच शालार्थ आयडी व संच मान्यते संदर्भात लवकरात लवकर देण्यासंदर्भात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना निर्देश देण्यात आले ,तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित मेलीकडे बिल व फरकाच्या रकमा बाबत देखील तात्काळ कारवाईची निर्देश देण्यात आले. तसेच प्रस्तावित वाढीव पदांची यादी येत्या सोमवार पर्यंत देण्याच्या आश्वासन यावेळी संचालक यांनी दिले.

