1 min read

स्व. पंढरीनाथ छ. भांडारकर आणि प्रा. र. का. केले फार्मसी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

Loading

स्व. पंढरीनाथ छ. भांडारकर आणि प्रा. र. का. केले फार्मसी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
अमळनेर: गुरु पोर्णिमेच्या पावन दिनी खा. शि. मंडळ संचालित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, या महाविद्यालयातील डिप्लोमा व डीग्री फार्मसी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळा, मुंबई यांनी घेतलेल्या डी. फार्मसीच्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये अंतिम वर्षात प्रथम आलेल्या राजनंदिनी महाजन (८६.०९ %), सेजल शाह (८२.८२ %, द्वितीय) व रोहन सपकाळे (८२%, तृतीय), प्रथम वर्ष डी . फार्मसीत प्रथम आलेली कल्याणी महाजन (७९ %), मानसी पाटील (७८.९० % द्वितीय) व खाटिक बुशरा (७८.३० % तृतीय) तसेच डॉ. बाबास्हेब आंबेडकर टेक्नोलॉजीकाल युनिव्हर्सिटी, लोणेरे मार्फत घेण्यात आलेल्या बो फार्मसी तृतीय सत्राच्या परीक्षेत प्रथम आलेली अंकिता भदाणे ( ९.२४ CGPA), धीरज नागदेव (८.८७ CGPA, द्वितीय) व रितिका भामरे (८.८६ CGPA, तृतीय) या सर्वांचा सत्कार खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप जी अग्रवाल, सदस्य हरी भिका वाणी, चिटणीस डॉ. अरुण जैन, प्रा. प्राचार्य रविंद्र माळी, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रसंगी डॉ. अनिल शिंदे यांनी भविष्यात फार्मसी क्षेत्रात असलेल्या विविध संधी बद्दल माहिती देवून मार्क्स सोबत विषयांचे ज्ञान असणे गरजेचे आहे असे मत मांडले. प्रा. कोचर यांनी मानवी जीवनात गुरूंचे असलेले महत्व विषद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रविंद्र माळी व सूत्रसंचालन प्रा रोशनी भावसार यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *