साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी
सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य अपेक्षित
डॉ. अविनाश जोशी
![]()

साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी
सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य अपेक्षित
डॉ. अविनाश जोशी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राज्यातील सर्व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था ,मंगल कार्यालय, हॉटेल यामध्ये केली जाणार आहे व त्या सर्व मान्यवरांना खानदेशी मेनू दिले जाणार आहेत. कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी पूर्णपणे घेतली जाणार आहे. खानदेशातील साहित्य कवींना विचारपीठ उपलब्ध करून दिले जाईल यासाठी मी वरिष्ठ पातळीवर विनंती करणार आहे. वेगवेगळ्या समित्या केल्या जाणार आहेत त्यात सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मनापासून सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन अमळनेर येथे जी.एस हायस्कूलमध्ये मध्येअखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत विचार विनिमय बैठकीत मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात इतर राज्यातील मराठी साहित्यिक ,कवी या संमेलनाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत व त्यांचाही सहभाग संमेलनात करून घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होणार आहे त्यासाठी वेळोवेळी ज्या ज्या सूचना असतील व माहिती असेल ती सर्व सांगितली जाईल असे त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर-सोमनाथ ब्रम्हे,श्यामकांत भदाणे,डॉ अविनाश जोशी,रमेश पवार, नरेंद्र निकुंभ, शरद पाटील होते..
प्रस्ताविक शरद पाटील यांनी केले. तर साहित्य संमेलनाच्या बाबतीत काही सूचना व संमेलना संदर्भात सक्रिय सहभागाबद्दल नरेंद्र निकुंभ मनोगतात म्हणाले कि साहित्य संमेलनाच्या नियोजनात सहकार्य करावे असे सांगितले तर डॉ अर्पणा मुठे-सर्वतोपरी सहकार्य करू सांगितले, प्रा.डॉ माधुरी भांडारकर
साहित्य संमेलन मिळाले अभिनाची गोष्ट आहे असे सांगत साहित्यिक विलास पाटील चोपडा संमेलनाच्या समितीत योगदान करण्यासाठी तयार आहोत असे सांगितले, तर साहित्यिक डॉ कुणाल पवार यांनी सांगितले कि सर्व क्षेत्रातील व्यक्तीना साहित्य संमेलनात समावेश करावा असे सांगत तर मा.पोलीस अधिकारी कंखरे यांनी संमेलनाच्या माध्यमातून पाडळसरे धरणावर फोकस करावा व
साहित्यिक यांच्या जेवनाची,व राहण्याची व्यवस्था करण्यात आम्ही सहकार्य करू असे सांगितले,तर उदयोजक बजरंग अग्रवाल यांनी संमेलनाची जबाबदारी मनापासून पार पाडा असे सांगितले,तर
प्रा डॉ विजय जोशी यांनी
योगदान देऊन संमेलन यशस्वी करून दाखवा असे सांगत साहित्य संमेलन आयोजन करणे सोपी गोष्ट नाही, सर्व साहित्यिक ,लेखक यांना सांभाळून घेणे महत्त्वाचे आहे.मंडळाच्या कार्यकारणीने सर्वांना विश्वासात घ्या असे सांगितले. तर
पत्रकार डिगंबर महाले म्हणाले की
साहित्य संमेलन भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल व प्रत्यकाने जबाबदारी प्रामणिकपणे पार पाडा व साहित्य संमेलनाला पत्रकारांचे सहकार्य राहील असे सांगितले. तर मा.प्राचार्य डॉ एल.ए.पाटील म्हणाले की
प्रत्येकाची जबाबदारी समजणे कठीण आहे, अगोदर जबाबदारी द्या,वास्तव परिस्थिती वर चर्चा करा,माझ्याकडून साहित्य संमेलनासाठी 21 हजार रुपये देणगी मी जाहीर करतो तर प्रा डॉ रमेश माने म्हणाले की आतापर्यंत साहित्य संमेलनात खान्देशातील साहित्यिकांना संधी मिळाली नाही ,खान्देशातील साहित्यिक यांना प्रतिनिधित्व मिळत नाही खंत वाटते असे सांगत
सभामंडपाना कवीचे नाव दिले पाहिजे असे सांगितले. प्रा संजय करंजे यांनी हि मनोगत व्यक्त केले. तर साने गुरुजी स्मारक समितीच्या समन्वयक
दर्शना पवार म्हणाल्या कि
सानेगुरुजी कर्मभूमीचे सर्व सदस्यांचे सहकार्य राहील,साहित्य संमेलनाच्या आनंदापासून महीलांना वंचित ठेवू नका,इतरांना कामे द्या, महिला पाहुणे मंडळांची स्वयंपाक व राहण्याची व्यवस्था करण्यात राहिले तर ते साहित्य संमेलनाच्या आनंदापासून वंचित राहतील असेही सांगितले..
साहित्य संमेलनाच्या सहविचार सभेत मराठी वांग्मय मंडळाचे सर्व संचालक मंडळ, साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय मंडळाचे सर्व संचालक मंडळ, साहित्यिक, डॉक्टर, प्राध्यापक, मुख्याध्यापक,शिक्षक, पत्रकार ,व्यावसायिक, उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



